जीपची टेम्पोसह मोटारीला धडक; 6 जण जखमी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

खेड- गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना सोडून भरधाव वेगाने मुंबईकडे पुन्हा भाडे आणण्यासाठी निघालेल्या जीपने महामार्गावरील जांबुर्डे-मोरवंडे केंद्र शाळेजवळ मोटार आणि टेम्पोला धडक दिल्याने मोटारीतील पाच, तर टेम्पोमधील महिला असे सहा जण जखमी झाले. 

जीपचा चालक दशरथ कऱ्हे (23, रा. कळंबोली) हा जीप घेऊन (एमएच 10 सीएन 6051) घेऊन लांजा येथे गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांना सोडण्यासाठी आला होता. तो सकाळी मुंबईकडे निघाला होता. दुपारी जांबुर्डे-मोरवंडे केंद्रशाळेजवळ आला असता त्याला डुलकी लागली आणि भरधाव वेगातील जीप समोरून येणाऱ्या मोटारीवर (एमएच 46 एपी 7448) डाव्या बाजूला घासून मोटारीपाठीमागे असलेल्या टेम्पोवर आदळला. अपघातात मोटारीतील विलास गंगाराम पवार (वय 47), आर्या आतिष पवार (29), पूजा राजेश सुर्वे (33), आदित्य राजेश सुर्वे (12), काव्या आतिष पवार (2), तर टेम्पोमधील सारिका नीलेश काणेकर (26, रा. शिव, खेड) हे प्रवासी जखमी झाले. मोटारीचा चालक आतिष पवार हा मिरारोड येथून कुटुंबासह लांजा तालुक्‍यातील गोवीळ येथे गणेशोत्सवासाठी निघाला होता. 

Web Title: Jeep car collided with a tempo; 6 injured