नोटांच्या निर्णयावर विनोदाचा पाऊस

अमोल टेंबकर : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 नोव्हेंबर 2016

सावंतवाडी- मोदी सरकारने पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांत असंख्य विनोदांचा व्हॉटसऍप, फेसबूक ट्विटरवर पाऊस पडला. यात काही राजकीय नेत्यांची टिंगलटवाळी करण्याबरोबर अनेक विशेषत: महिला आणि पत्नीवरील विनोदांचा समावेश होता.

त्यानंतर असे असंख्य विनोद पाहायला मिळाल्यानंतर आज कळले, की भारतातील लोकांत किती टॅलेन्ट दडले आहे. अशा आशयाच्या विनोदाबरोबर वारंवार मॅसेज पाठवू नका. पाचशे, हजाराच्या नोटा मोजताना चुका होत आहे, असे अनेक किस्से पाहायला मिळत आहेत.
काळ्या पैशाला दणका देण्यासाठी मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईकप्रमाणे अचानक काल (ता. 8) रात्री आठच्या सुमारास देशातील पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्या आहेत. त्या आता वापरातून गायब केल्या जाणार आहेत, असे जाहीर केले.

त्यानंतर काही काळात व्हॉटसऍप आणि फेसबुकवर विनोदाचे अनेक किस्से लोकांना पाहायला मिळाले.
यात अनेक किस्से सांगणारे विनोद पाहावयास मिळाले. यावर्षी कोणी लग्न करू नका, पाकिटात 101 रुपयेच मिळतील, बायकांनो साड्यांच्या घडीमध्ये लपविलेल्या नोटा मुकाट्याने नवऱ्यांना द्या आदी विनोदांचा यात समावेश होता. आता सर्वांना कळले शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडला, की त्याला कस वाटतं असे विविध जोक्‍स सुरू होते.
सध्या सुरू असलेल्या पालिका निवडणुकीशी या निर्णयाला जोडणारे विनोदही फिरत होते.

Web Title: jokes on currency demonitisation