कणकवली : गोवा बनावटीची ३७ लाखांची दारू जप्त

राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने येथे ३७ लाख चार हजार ४०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली.
 गोवा बनावटीची दारू जप्त केली.
गोवा बनावटीची दारू जप्त केली.sakal

कणकवली: राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने येथे ३७ लाख चार हजार ४०० रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. कारवाईत नऊ लाखांचा टेम्पोही जप्त केला आहे. मुंबई-गोवा महामार्गावर येथील गड नदी उड्डाणपुलाजवळ सोमवारी (ता. ७) रात्री साडेनऊच्या दरम्यान ही कारवाई झाली. याप्रकरणी पथकाने चालक मोहन शंकर जोशी (रा. उदयपूर, राजस्थान) याला अटक केली आहे.

याबाबत विभागाने दिलेली माहिती अशी अधिकाऱ्यांना गोवा बनावटीची दारू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्कच्या सिंधुदुर्ग विभागातील कणकवली पथकाने वाहनांची तपासणी केली. पथकाने संशयावरून एक चॉकलेटी मोठा टेम्पो (एमएच ४९- ३४७१) थांबविला. टेम्पो सीलबंद होता. सील तोडून तपासणी केली असता टेम्पोमध्ये वैद्यकीय बिलांच्या नावाखाली चोरट्या पध्दतीने दारूची वाहतूक सुरू असल्याचे आढळले. अशा दारूचे २९५ बॉक्स व बिअरचे ४० बॉक्स जप्त करण्यात आले. त्याची अंदाजे किंमत ३७ लाख ४ हजार ४०० तर टेम्पोची किंमत नऊ लाख असा एकूण ४६ लाख चार हजार ४०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विभागाचे अधीक्षक डॉ. एच. तडवी यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनानुसार कणकवली निरीक्षक प्रभात सावंत, दुय्यम निरीक्षक गणेश जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक सूरज चौधरी, श्रीमती स्नेहल कुवेसकर, शिवशंकर मुपडे, जगन चव्हाण यांच्या पथकाने कारावाई केली. गणेश जाधव तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com