वीज समस्यांबाबत भाजप आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

कणकवलीत कार्यकारी अभियंत्यांना घेराओ - १५ ऑगस्टपूर्वी वीज जोडणीची ग्वाही

कणकवली - इंदिरा आवास घरकुलांची रखडलेली वीज जोडणी, वीज कर्मचाऱ्याची मुलाला मारहाण, गंजलेले विद्युत खांब, डामरे गावात होत असलेली वीज चोरी आदी विविध मुद्द्यांवर आक्रमक होत भाजप पदाधिकाऱ्यांनी आज महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांना घेराओ घातला. सुमारे दोन तास सुरू असलेल्या आंदोलनानंतर महावितरणचे गवळी यांनी येत्या दोन महिन्यात सर्व वीज समस्या सोडविण्याची ग्वाही दिली. तर इंदिरा आवास घरकुलांना १५ ऑगस्ट पूर्वी वीज जोडण्या दिल्या जातील अशी ग्वाही दिली.

भाजपचे तालुकाध्यक्ष संदेश सावंत-पटेल यांच्यासह जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या प्रज्ञा ढवण, महिला तालुकाध्यक्षा गीतांजली कामत, शहराध्यक्षा प्राची कर्पे, वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष शिशिर परुळेकर, रमेश पावसकर, संतोष पुजारे, राजू सदडेकर, महेंद्र पांचाळ, सुहास सावंत, भाई परब, हळवल उपसरपंच प्रदीप गावडे, डामरे सरपंच बबलू सावंत, सुभाष सावंत, सुदाम तेली आदींनी आज महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी यांची भेट घेतली. यावेळी या सर्वांनी तालुक्‍यातील विजेच्या विविध समस्यांबाबत तक्रारी मांडल्या. तसेच महावितरणच्या दिरंगाई कारभाराबाबत नाराजी व्यक्‍त केली.

गंजलेले वीज खांबाबाबत स्पष्टीकरण देताना गवळी यांनी तालुक्‍याला ८० खांब प्राप्त झाल्याची माहिती दिली. यात लवकरच फोंडाघाट, बिडवाडी, साकेडी, हळवल या गावातील वीज खांब प्राधान्याने बदलण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना फोन उचलण्याबाबत सूचना देण्यात येतील, असे गवळी यांनी सांगितले. दरम्यान, बिडवाडी गावातील वीज समस्या चार दिवसांत न सुटल्यास मीटरचे रीडिंग घेऊ देणार नसल्याचा इशारा सुदाम तेली यांनी दिला.

Web Title: kankavali konkan news BJP aggressive about power problems