जानवली नदीमध्ये तरुणीची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

कणकवली - जानवली नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती असताना सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास एका १८ वर्षांच्या तरुणीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस तिचा शोध घेत होते.

कणकवली - जानवली नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती असताना सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास एका १८ वर्षांच्या तरुणीने पुलावरून उडी मारून आत्महत्या केली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस तिचा शोध घेत होते.

गेले दोन दिवस तालुक्‍यात संततधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नदी-नाल्यांना पूरसदृश पाणी आले. मुंबई-गोवा महामार्गावरील शहराला लागून असलेल्या जानवली नदीपात्राच्या नवीन पुलाच्या कठड्यावर एक १८ वर्षांची तरुणी चालत गेली. कठड्यावरून थेट नदीपात्रात तिने उडी मारली. हा प्रकार जानवलीतील दामू सावंत यांनी पाहिला. त्यानंतर घटनास्थळी अनेक जणांनी धाव घेतली. पोलिसांनाही माहिती दिली. घटनास्थळी पोलिस आणि तहसीलदार वैशाली माने यांच्यासह आपत्ती कक्षाचे पथक दाखल झाले. चर्चेदरम्यान त्या तरुणीने अंगात हिरव्या रंगाचा टी शर्ट आणि लेगीज असा पेहराव घातला होता. नागरिकांची जमवाजमव होईपर्यंत ती तरुणी नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून गेली. कलमठ गोसावीवाडी दरम्यान कुणीतरी वाहन जात असल्याबाबतची खबर बचाव पथकापर्यंत पोहोचली होती. त्या परिसरातही काही काळ शोधमोहीम राबविली. मुसळधार पावसामुळे जानवली नदीचे पात्र दुथडी भरून वाहत होते. परिणामी त्या तरुणीचा शोध घेणे अवघड बनले. त्यातच पावसाची रिपरिप सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. 

दरम्यान त्याच परिसरातील एक महिला रडतच घटनास्थळी आली. ती म्हणत होती, आपली मुलगी काही वेळापूर्वी घरातून मैत्रिणीकडे जाते असे सांगून गेली. त्यामुळे जमलेल्यांनी अनेक शंका उपस्थित केल्या. त्या तरुणीच्या वर्णनावरून ती जवळपासच्या परिसरातील असावी, असा अंदाज व्यक्त केला जात होता. उशिरापर्यंत मात्र त्या तरुणीबाबतची माहिती स्पष्ट झाली नसल्याने तिच्या आत्महत्येचे गूढ मात्र समजू शकलेले नाही. या घटनेची खबर दामू सावंत यांनी उशिराने पोलिस ठाण्यात दाखल केली.

Web Title: kankavali konkan news girl suicide in janawali river