सुरू होण्याआधीच ट्रामा केअर इमारतीला गळती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

कणकवली - येथील उपजिल्हा रुग्णालय आवारात ट्रामा केअर सेंटरसाठी इमारत बांधली आहे. मात्र, हे केंद्र सुरू होण्यापूर्वीच या इमारतीमधील सर्व खोल्यांना गळती लागली आहे. यात इमारतीसाठी खर्च झालेला लाखोंचा निधी वाया गेल्याचे चित्र आहे. सध्या पंख्याच्या साहाय्याने ट्रामा केअर इमारतीमध्ये आलेले पाणी सुकविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर उभे करण्यासाठी राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यानुसार अद्ययावत ऑपरेशन थिएटर्स, दहा कॉटच्या स्वतंत्र खोल्या तसेच रुग्ण तपासणी व इतर उपचाराच्या रुग्णांसाठी स्वतंत्र खोल्या बांधल्या आहेत. इमारतीचे बांधकाम गतवर्षी पूर्ण करण्यात आले. मात्र यंत्रसामग्री आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे न भरल्याने हे केंद्र अद्याप कार्यान्वित झाले नाही. 

मुंबई-गोवा महामार्गावर होणाऱ्या अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत. जखमी रुग्ण कोणत्या स्थितीत आहे, त्याच्या अपघातातील दुखापतीची स्थिती काय आहे लक्षात घेऊन अधिक उपचारासाठी रुग्णाला बाहेरच्या रुग्णालयात पाठवणे आवश्‍यक आहे की, नाही याच्या तपासणीसाठी हे ट्रॉमा केअर सेंटर महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्‍ती होताच हे केंद्र केव्हाही सुरू होईल यासाठी सज्जताही ठेवली आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात ट्रामा केअर इमारतीला गळती लागून सर्व खोल्यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे गळक्‍या इमारतीमध्ये ट्रामा केअर सेंटर कसे सुरू होणार असा प्रश्‍न व्यक्‍त केला जात आहे.

Web Title: kankavali konkan news trama care building leakage