सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा ३४ टक्के

तुषार सावंत
बुधवार, 21 जून 2017

पावसाचा जोर कायम - शेतकऱ्यांकडून भातलावणी कामाला सुरुवात

कणकवली - सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील आंतरराज्य तिलारी या मोठ्या प्रकल्पात ३५.९५ टक्के, देवघर मध्य पाटबंधारे प्रकल्पात ४२.३ तर कोर्लेसातंडी प्रकल्पात ९३.७१ टक्के मिळून जिल्ह्यातील उर्वरीत २८ लघुपाटंबधारे प्रकल्प धरणक्षेत्रात सरासरी ३३.६९ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून भात पेरणीनंतर लावणीच्या कामाला दमदार सुरवात झाली आहे. 

सिंधुदुर्गात गेल्या मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पावसाला सुरुवात झाली. याचवेळी भातपेरणी सुरू झाली. वळवाच्या पावसानंतर नदी नाले, विहिरींची पाणीपातळी वाढली. मात्र ३० मे रोजी झालेल्या मुसळधार पावसाने धरणाची पाणीपातळी वाढू लागली. मृगनक्षत्रानंतर मान्सूनचा जोर कायम राहिला. 

परिणामी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली असून शेतकरीही सुखावला आहे. सद्य:स्थितीत सर्व धरणांमध्ये एकूण ७३०.७४५ द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून उपयुक्त पाणीसाठा २४६ द.ल.घ.मी. आहे. 

गतवर्षी आजच्या दिवशी उपयुक्त पाणीसाठा २७.५७ टक्के तर २०१५ ला केवळ १७.७७ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तिलारी आंतरराज्य मोठ्या प्रकल्पात १६०.८११० द.ल.घ.मी. मिळून एकूण ३५.९५ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्पात ४१.१९६०  द.ल.घ.मी. तर कोर्लेसातंडी (देवगड) प्रकल्पात २३.९५७०  द.ल.घ.मी. पाणीसाठा आहे. 

लघुपाटबंधारे प्रकल्पात टक्केवारीप्रमाणे साठा असा - 
शिवडाव  ११.७४, नाधवडे ४१.६२, ओटव ४३.०१, देदोनवाडी ४.४४, तरंदळे ६.०३, आडेली २२.४४, आंबोली ६७.५९, चोरगेवाडी २३.०३, हातेरी २५.३२, माडखोल १००, निळेली ३७.८४, ओरोसबुद्रुक १४.१८, सनमटेंब २१.४२, तळेववाडी डिगस ६.९५, दाबाचीवाडी ३०.३६, पावशी ३४.५५, शिरवल २३.८४, पुळास ५७.२३, वाफोली १३.६९, कारिवडे ५.२०, धामापूर ४०.६०, हरकुळ खुर्द ८६.६४, ओसरगाव ११.८७, ओझरम ४९.०४, पोईप २६.१२, शिरगाव ६.२७, तिथवली १२.४२ आणि लोरे २७.०८ टक्के इतका पाणी साठा झाला आहे. 

* धरण परिसरात ६११.४ मिलीमीटर पाऊस
* सह्याद्री पट्ट्यात पावसाचे प्रमाण वाढले 
* सिंधुदुर्गात एकूण ४६०९.२३  मिलीमीटर पाऊस
* जिल्ह्यात सरासरी ५७६.१५ मिलीमीटर पावसाची नोंद
* सर्वाधिक पाऊस वेंगुर्लेत पाऊस ६९७.२३ मिलीमीटर 

सोमवारी २४ तासात झालेला पाऊस असा - 
* दोडामार्ग - ६१ मिमी. (७०७ मिलीमीटर)
* सावंतवाडी - १६ मिमी. (५९४ मिलीमीटर)
* वेंगुर्ला - ३४.४ मिमी. (६९७.२३ मिलीमीटर)
* कुडाळ - १७ मिमी. (५२३ मिलीमीटर)
* मालवण - १ मिमी. (६१० मिलीमीटर)
* कणकवली - ६६ मिमी. (६१० मिलीमीटर)
* देवगड - १४ मिमी. (५५१ मिलीमीटर)
* वैभववाडी - ३१ मिमी. (३१७ मिलीमीटर)

Web Title: kankavali konkan news water dam storage 34%