मान्सूनपूर्व सरींनंतर भात पेरणीला वेग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

कणकवली - सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसात मान्सूनपूर्व सरी बरसल्यानंतर भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. जिल्ह्याचे अर्थकारण भातशेतीवर अवलंबून आहे. गेल्या आठवडाभरात पावसाच्या सरी बरसल्याने भात पेरणीची सज्जता शेतकऱ्यांनी ठेवली होती. गेल्या दोन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने सर्वच भागात भात पेरणी केली जात आहे.

यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व सरी कोसळल्या होत्या. यामुळे शेतकऱ्यांनी मागील आठवड्यातच विविध जातीच्या भातांच्या वाणांची खरेदी केली होती. तसेच शेती अवजारे, बैलजोडी यांचीही सज्जता ठेवली होती. यंदा सरासरी एवढा पाऊस होण्याचा अंदाज वेधशाळेने व्यक्‍त केला आहे. यामुळे बळीराजा देखील सुखावला आहे. तालुक्‍यात खारेपाटणसह इतर काही भागात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच नदी, ओढ्यातील पाण्याच्या साहाय्याने पेरणीच्या कामांना प्रारंभ झाला होता. तर उर्वरित भागात काल (ता.३१) पासून भात पेरणीच्या कामांना वेग आला आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हमी भाव न मिळणे, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे दुर्लक्ष आदी कारणांमुळे राज्यातील शेतकऱ्यांनी आजपासून संप पुकारला आहे. मात्र सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्याचे चित्र सध्या नाही.

Web Title: Kankavali news rain