‘त्या’ शाळकरी मुलाचा मृतदेह अखेर सापडला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 जून 2017

कणकवली - गडनदीत बुडालेल्या दुसऱ्या शाळकरी मुलाचाही मृतदेह आज सकाळी सापडला आहे. प्रसन्नजीत सुमंगल कुंभवडेकर (वय १७) असे त्याचे नाव आहे. गडनदी पात्रात आशिये गावातील वाकित कोंड येथे हा मृतदेह सापडला आहे.  पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मृतदेह नदीतून बाहेर काढला. दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून प्रसन्नजीतचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय हेलावणारा होता. 

कणकवलीत राहणाऱ्या काही मुलांनी आई-वडिलांना कोणतीही माहिती न देता शनिवारी दुपारी गडनदीचे पात्र गाठले होते. नदीपात्राला पुरसदृश्‍यपाणी आले होते. यात रामंचद्र माणगांवकर आणि प्रसन्नजीत सुमंगल कुंभवडेकर हे दोघे वाहुन गेले. या प्रकरानंतर सोबत असलेल्या मित्रांनी थेट घर गाठले. या प्रकाराची माहिती लगतच्या ग्रामस्थांना किंवा आपल्या नातेवाईकांनाही दिली नाही. दोन्ही मुले रात्री उशीरा झाला तरी परतली नसल्याने आई -वडीलांना त्यांची शोध सुरू केला. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. नातेवाईकांनी पोलिसात खबर दिली. पण त्या दोघांचा शनिवारी रात्री शोधतरी कोठे घेणार अशी स्थिती होती. मात्र पोलिसांना संशय आल्यानंतर त्या दोंघाच्या मित्राची चौकशी केली. यामुळे रविवारी सायंकाळी रामंचद्र आणि प्रसन्नजीत हे नदीच्या डोहात बुडाल्याची माहिती पुढे आली. या माहितीने पोलिस यंत्रणा सतर्क 

झाली. गडनदीपात्रात शोध मोहिमेला सुरुवात झाली.  ग्रामस्थांची सतर्कता आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे रविवारी सायंकाळी रामचंद्राचा मृतदेह सापडला. मात्र प्रसन्नजीतबाबत काही माहिती मिळाली नव्हती. अखेर आज सकाळपासुन पुन्हा शोधमोहीम सुरू झाली. रात्रभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने नदीपात्राला गडूळपाणी आले होते. पण नवाने रूजू झालेले पोलिस उपनिरीक्षक सागर वरुटे यांच्यासह कणकवली  पोलीस कर्मचारी, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, माजी उपसभापती महेश गुरव, रामचंद्र बाने यांच्यासह ग्रामस्थ शोध मोहिमेत सहभाग घेतला. अखेर दोन्ही मुलांचे मृतदेह गडनदीपात्रातून बाहेर काढण्यात आले.

Web Title: kankavali news student