कणकवली : टोलविरोधात रस्त्यावर उतरू : परशुराम उपरकर

लोकप्रतिनिधीवर छुप्या समर्थनाचा आरोप
परशुराम उपरकर
परशुराम उपरकर sakal

कणकवली : चौपदरीकरणाच्या कामात जनतेसोबत असल्याचे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी, सत्ताधाऱ्यांनी ठेकेदाराची बाजू घेत जनतेला फसविले. त्यातीलच एक लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांना लढायला लावून आपण मात्र टोल कंपनीच्या मॅनेजरसोबत बैठका घेतल्या. टोलचे काम आपणाला द्या, आपण सारे मॅनेज करतो, असे सांगत या लोकप्रतिनिधीने येथील जनतेचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत मनसे सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी व अपूर्ण कामे पूर्ण होत नाहीत, तोवर टोलविरोधात ठामपणे रस्त्यावर उतरेल, असा इशारा मनसेचे सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

याबाबत श्री. उपरकर म्हणाले, ‘एकीकडे टोलवसुली विरोधात आंदोलने सुरू असताना जिल्ह्यातील एका लोकप्रतिनिधीने टोलवसुली कंपनीच्या मॅनेजर सोबत चार-पाच दिवसांपूर्वी मुंबईत बैठक केल्याची माहिती पुढे आली आहे. केंद्रस्तराचा वापर करून ही बैठक घेत टोल वसुलीची जबाबदारी आपल्याकडे देण्यास या लोकप्रतिनिधीने सांगितल्याचे समजते. आपल्याकडे जबाबदारी दिल्यास सारा विरोध आपण मावळून काढू, असे या लोकप्रतिनिधीने सांगताच एकीकडे जिल्ह्यात टोलविरोधी असल्याचे दाखवून दुसरीकडे टोलची जबाबदारी घेण्याचा हा प्रकार आहे.’

ते म्हणाले, ‘टोल वसुलीबाबत मनसेने सुरुवातीपासूनच जनतेची बाजू घेत टोल वसुलीला सक्त विरोध केला आहे. टोलवसुलीची ट्रायल मनसेने पहिल्याच दिवशी बंद पाडली. त्यानंतर जिल्ह्यातील अन्य काही राजकीय पक्षांनीही टोलविरोधी आंदोलने केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व एम.एच. ०७ पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी मिळायलाच हवी. तसेच जोपर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होत नाही, लोकांना मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत टोलवसुली केल्यास मनसे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, ही आमची भूमिका आहे.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com