Missing Lawyer Case
esakal
तीन महिन्यांपासून वकील तृशांत आरडे बेपत्ता आहेत.
किशोरी आरडे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले.
आमदारांनी आरोप फेटाळले व मानहानीचा इशारा दिला.
Karjat Missing lawyer Case : कर्जतमधील आरडे वकील बेपत्ता प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. वकील तृशांत आरडे यांच्या बेपत्ता होण्यामागे आमदार महेंद्र थोरवे (MLA Mahendra Thorve) यांचा हात असल्याचा गंभीर आरोप त्यांच्या पत्नी किशोरी आरडे यांनी केला आहे. मंगळवारी अलिबाग येथे पत्रकार परिषद घेऊन किशोरी आरडे (Kishori Arde) यांनी शिंदे गटाच्या आमदाराविरोधात आरोप करत निशाणा साधलाय. मात्र, या सर्व आरोपांचे आमदार थोरवे यांनी ठामपणे खंडण केले आहे.