कर्नाळा स्पोर्ट्स अॅकेडमीमध्ये मल्टिपर्पज टर्फचे उद्घाटन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहील मल्टिपर्पज टर्फ कोर्ट पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स येथे बनवण्यात आले आहे. कर्नाळा स्पोर्ट अॅकेडमी आणि कॅप क्लब यांच्या वतीने बनवण्यात आलेल्या टर्फ कोर्टचे उद्घाटन सोमवारी (ता. २) आ. विवेक पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

पनवेल : रायगड जिल्ह्यातील पहील मल्टिपर्पज टर्फ कोर्ट पनवेल मधील कर्नाळा स्पोर्ट्स येथे बनवण्यात आले आहे. कर्नाळा स्पोर्ट अॅकेडमी आणि कॅप क्लब यांच्या वतीने बनवण्यात आलेल्या टर्फ कोर्टचे उद्घाटन सोमवारी (ता. २) आ. विवेक पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, शेकाप पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.

मनोज देढिया आणि मनोहर सचदेव यांच्या संकल्पनेतून आणि कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमीच्या सहकाऱ्याने कॅप क्लबने मल्टिपर्पज टर्फ कोर्ट उभारले आहे. यापूर्वी पनवेल परिसरातील मुलांना टर्फ कोर्टसाठी नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी जावे लागत असे. परंतु आता कर्नाळा स्पोर्ट्स ऍकेडमी  मध्ये त्यांना सिंथेटिक टर्फ वर फुटबॉल, क्रिकेट,व्हॉलीबॉल,कबड्डी,हॅण्डबॉल सारखे खेळ खेळता येऊ शकतील. तसेच कॉर्पोरेट सेक्टर मधील स्पोर्ट्स इव्हेंट्स, थीम पार्टीज यासाठी सुद्धा हे सिंथेटिक टर्फ उपयुक्त ठरणार आहे. 

उद्घाटनानंतर सेव्हन स्टार फुटबॉल अकेडमी आणि प्रो टीम यांच्या मध्ये फुटबॉलचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात आला. चेतन पुजारीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या सेव्हन स्टार संघाने ४ विरुद्ध १ गोलने प्रो टीम ला नमवले. १४ वर्षांखालील मुलांच्या चा प्रदर्शनीय सामन्यात पेनल्टी शूट आउटचा अवलंब करावा लागला त्यात सुद्धा सेव्हन स्टार फुटबॉल अॅकेडमीने बाजी मारली. 

या  उद्घाटन सोहळ्याला नगरसेविका डॉ. सुरेखा मोहोकर, डॉ. विलास मोहोकर, कर्नाळा स्पोर्ट्स अकेडमीचे अध्यक्ष मुकुंद म्हात्रे, उपाध्यक्ष सुभाष पाटील, संचालक सुर्यकांत ठाकूर, व्यवस्थापकीय संचालक शशिकांत दराडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शमा फाटक हट्टंगडी, कला विभाग सहप्रमुख राहुल सोनावणे, लक्ष शूटिंग क्लबचे सिद्धार्थ शिरूर आदी मान्यवरांसह खेळाडू, दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आम्ही कित्येक मुलांना रात्री अपरात्री  सराव करून घरी परतत असताना पाहायचो. खेळाडूंना टर्फ ची सोय  नसल्यामुळे नवी मुंबई मध्ये जावे लागे. तेव्हा पनवेल परिसरातील खेळाडूंना इथेच ही सुविधा देण्याबाबत  आम्ही विचार करू लागलो. मा आमदार विवेक पाटील यांनी त्याला लगेच दुजोरा दिला.कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळी तसेच व्यापारी मित्र कामे संपल्यावर, रात्री खेळणे पसंत करतात त्यांच्यासाठी देखील हे टर्फ चांगला पर्याय असेल, असे मनोज देढीया यांनी सांगितले.

सिमेंट कोर्ट किंवा रफ सरफेस वर खेळाडूंना दुखापत होण्याचा धोका असतो.तरुण वयात मोठी इंज्युरी झाली कि, आयुष्यभर त्याचा त्रास सहन करावा लागतो.टर्फ कोर्ट वर दुखापतीचा धोका खूप कमी असतो.शिवाय व्यावसायिक स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी खेळाडूंना अपडेटेड राहण्याच्या दृष्टीने हे टर्फ कोर्ट अत्यंत उपयोगी ठरेल, असे मनोहर सचदेव यांनी सांगितले. 

Web Title: karnala sports academy starts multi purpose terf