महिनाभर आधीच कर्नाटकी आंबा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 मार्च 2017

कणकवली - सहाशे ते नऊशे रुपये डझन असणारा हापूस जिल्ह्यातील बाजारपेठात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याचबरोबर गेल्या दोन तीन दिवसापासून तीनशे ते साडेतीनशे रुपये डझन या दराने कर्नाटकचा आंबाही दाखल झाला आहे. दोन्ही आंब्याचे दर चढे असल्याने सर्वसामान्य नागरिक मात्र आंबा खरेदीपासून दूर राहिला आहे. दरम्यान, हापूस आंब्याचा सिझन संपत असताना दरवर्षी कर्नाटकचा आंबा दाखल होतो. यंदा मात्र एक महिना आधीच कर्नाटकचा आंबा बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. 

पहिल्या टप्प्यातील हापूस आंबा गेल्या दोन आठवड्यापासून जिल्ह्यातील बाजारपेठात दाखल होत आहे. यात छोट्या आकाराची फळे 600 ते 700 रुपये डझन तर मोठ्या आकाराची फळांचा प्रती डझन नऊशे ते एक हजार रुपयापर्यंत कायम राहिला आहे. जिल्ह्यात एप्रिलनंतर मोठ्या प्रमाणात आंबा दाखल होत असतो. यामुळे एप्रिल दुसऱ्या आठवड्यापासून हापूसचे दर आवाक्‍यात येतील, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे. 

हापूस आंब्याचा सीझन संपत असताना दरवर्षी कर्नाटकचा आंबा दाखल होतो. यंदा मात्र एक महिना आधीच कर्नाटकचा आंबा बाजारपेठेत दाखल होऊ लागला आहे. हा आंबा लहान आकाराचा असला तरी तीनशे ते साडेतीनशे रुपये असा प्रती डझनाचा दर असल्याने ग्राहकांनी या आंब्याकडेही पाठ फिरवली आहे. 

यंदाच्या हंगामात कोकणात पोषक हवामानामुळे हापूसचे उत्पादन चांगले आहे. तसेच बाजारात येत असलेल्या हापूसचा आकार आणि दर्जाही चांगला आहे, मात्र दरात तडजोड होत नसल्याने हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर आहे. 
 
Web Title: Karnataka Mango already filed a month