Kashedi Ghat Landslide : महामार्गावरील एक मार्गिका तब्बल 14 तास बंद; धामणदेवी-चोळई येथे दरड कोसळली, रस्ता खुला करण्याच्या कामात पावसाचे विघ्न

Kashedi Ghat landslide today : मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील कशेडी घाटात मोठी दरड कोसळून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मुंबईकडे जाणारी मार्गिका १४ तास बंद राहिली. प्रशासनाने दरड हटवून वाहतूक पुन्हा सुरू केली.
Mumbai Goa Highway road blocked by landslide

Mumbai Goa Highway road blocked by landslide

esakal

Updated on

खेड : तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कशेडी घाटात धामणदेवी व चोळई गावाजवळील हॉटेल अन्नपूर्णांसमोरील डोंगरावरून मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास मोठी दरड (Mumbai Goa Highway landslide latest news) कोसळली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी मार्गिका वाहतूक बंद करण्यात येऊन बुधवारी दुपारी अडीच वाजता वाहतूक सुरळीत झाली. महामार्गावरील मुंबईकडे जाणारी एक मार्गिका १४ तासानंतर सुरू करण्यात बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. दरड हटवताना काहीकाळ पावसाचा अडथळा आला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com