Mumbai Goa highway Kashedi tunnel safety
esakal
खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित कशेडी बोगद्यातील पाण्याचा पाझर आणि गळती अद्यापही थांबलेली नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाने केलेले सर्व तांत्रिक उपाय निष्फळ ठरले (Kashedi tunnel leakage during Ganeshotsav) असून, दोन्ही बोगद्यांमध्ये पाण्याची गळती सुरूच आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागणार आहे.