लाईव्ह न्यूज

kashedi: कशेडीच्या दोन्ही बोगद्यातून १५ मेपूर्वी वाहतूक सुरू; चाकरमान्यांना दिलासा, २०० पथदिपांची उभारणी लवकरच

दोन्ही बोगद्याबाहेरील मार्गावर २०० पथदिपांची उभारणीही करण्यात येणार आहे. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे १५ मेपूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्णक्षमतेने खुली होईल.
Work nearing completion at Kashedi twin tunnels, set to open for traffic by May 15 with 200 new streetlights for safe travel.
Work nearing completion at Kashedi twin tunnels, set to open for traffic by May 15 with 200 new streetlights for safe travel.Sakal
Updated on: 

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी येतील दोन्ही बोगद्याच्या पोलादपूर बाजूकडील कायमस्वरूपी वीजपुरवठा कार्यान्वित झाला आहे. रत्नागिरी बाजूकडील वीजपुरवठा येत्या १०-१५ दिवसातच पूर्ववत होईल. दोन्ही बोगद्याबाहेरील मार्गावर २०० पथदिपांची उभारणीही करण्यात येणार आहे. बोगद्यातील गळतीसह अंतर्गत कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. त्यामुळे १५ मेपूर्वी दोन्ही बोगद्यातील वाहतूक पूर्णक्षमतेने खुली होईल, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून सांगण्यात आले.

मे महिन्याच्या सुट्टी हंगामात गावी येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय असते. सणांच्या कालावधीत चाकरमान्यांनी बोगद्यातूनच सफर करण्यास सर्वाधिक पसंती दिली होती. १५ मे पूर्वी पूर्णक्षमतेने बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्रयत्नशील असल्याने सुट्टी हंगामात चाकरमान्यांचा प्रवास आरामदायी अन् सुस्साट होणार आहे. यामुळे चाकरमानी सुखावले आहेत. येत्या पंधरा दिवसात बोगद्यात २४ तास वीजपुरवठा कार्यान्वित होणार असल्याने प्रवाशांची चिंता कायमची मिटणार आहे.

ऐन उन्हाळ्यात दोन्ही बोगद्यात लागलेली गळती थांबवण्यासाठी पुन्हा ग्राऊंटिंगचा अवलंब करण्यात येणार आहे. हे कामदेखील हाती घेण्यात आले असून, लवकरच गळती थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही बोगद्यातील मार्गावर दोन्ही बाजूला २०० पथदिपांची उभारणी करण्यात येणार आहे. यासाठी विद्युतखांबासह आवश्यक ती यंत्रसामुग्रीही उपलब्ध झाली आहे. एक, दोन दिवसातच पथदिपांच्या उभारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.

दोन्ही बोगद्यातून पूर्णक्षमतेने वाहतूक खुली करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. कामेही सुरू असून बोगद्यातील वीजपुरवठा अर्धाअधिक सुरू झाला आहे. उर्वरित काम वेगाने केले जात आहे.
- पंकज गोसावी, अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com