टस्कराचा बंदोबस्त करा; केर-भेकुर्ली ग्रामस्थांची मागणी

Taskar
Taskar

दोडामार्ग : दोडामार्ग-केर-भेकुर्ली (ता. सिंधुदुर्ग) या रस्त्यावर आज (सोमवार) भला मोठा टस्कर उभा ठाकला आणि दुचाकीस्वारांच्या काळजाचे ठोके चुकले. केर गाव परिसरात सकाळी आठ वाजता टस्कराचे अनेकांना दर्शन झाले. 

घोटगेवाडी, मौर्ले, सोनावल, पाळ्ये आणि केर या गावात त्या टस्कराचा वावर आहे. तो थेट मानवी वस्तीत घुसत असल्याने त्याची दहशत आहे. घोटगेवाडी मौर्लेमध्ये अनेकांना त्याने पळताभुई थोडी केली होती. दोन दिवसांपूर्वी तो भेकुर्लीत दिसला होता. सकाळीही हा टस्कर केर गावाच्या परिसरात दिसला. 

केर-भेकुर्लीचे उपसरपंच महादेव देसाई यांनी शनिवार (ता. 23) तिलारी विश्रामगृहावर पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. देसाई यांनी ग्रामस्थांच्या वतीने निवेदनही दिले. तिलारी खोऱ्यातील अनेक गावात हत्तींचा धुडगूस सुरू आहे. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, पालकमंत्री केसरकर यांनी तिलारी धरणाच्या बुडीत क्षेत्रात हत्ती अभयारण्य बनविण्यात येणार असल्याचे पत्रकारांना सांगितले आहे. परिसरातील गावात हत्तींकडून नुकसान होऊ नये, म्हणून अभयारण्याच्या सभोवती मजबूत कुंपण घालण्यात येणार आहे. आत त्यांच्यासाठी खाद्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, असेही केसरकर म्हणाले. त्यामुळे अभयारण्य प्रत्यक्षात येईपर्यंत तरी वन्य हत्तींचा त्रास तालुकावासियांना सहन करावा लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com