खालापूर-पेण जोडमार्गावर खड्डे बुजवण्यास प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जानेवारी 2017

खोपोली - खालापूर-सावरोली मार्गाने पेण मार्ग जोडला आहे. याच मार्गाने द्रुतगती मार्गही जोडलेला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला. हे खड्डे बुजवण्याचे काम आयआरबी कंपनीने सोमवारपासून (ता. 9) सुरू केल्याने स्थानिक नागरिक व प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 

खालापूर-पेण मार्गाचा जोडरस्ता सावरोली मार्गे जातो. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. या मार्गावरून रसायनी, पेण, ढेकू औद्योगिक पट्ट्यात कारखान्यांचा माल वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. या मार्गावर वडवळ टोलनाक्‍यानजीक सावरोलीकडे येण्यासाठी एक उतरण आहे. या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांत आपटून वाहनांचे अपघात घडले आहेत. हे खड्डे बुजवण्याची मागणी सातत्याने केली जात होती; आयआरबी व सार्वजनिक बांधकाम विभागापैकी पुढाकार कोणी घ्यायचा, या वादात हे काम रखडले होते. वाढत्या अपघातांची दखल घेत सोमवारपासून आयआरबीने खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. 

Web Title: Khalapur-Pen road potholes