MNS Toll Plaza Protest : सुधागडवासीयांना खालापूर टोलमधून सूट देण्यास एमएसआरडीसीचा नकार; मनसेकडून आंदोलनाची तयारी, लवकरच बैठकीत पुढील दिशा ठरणार

Khalapur Toll Exemption Rejected | MSRDC Rejects Sudhagad MNS Demand : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलमाफीची सुधागड मनसेची मागणी एमएसआरडीसीने फेटाळली. स्थानिक नागरिकांना पूर्ण टोल भरावा लागत असल्याने नाराजी वाढली असून आंदोलनाचा इशारा सुनील साठे यांनी दिला आहे.khalapur
 Khalapur Toll Exemption Rejected | MSRDC Rejects Sudhagad MNS Demand

Khalapur Toll Exemption Rejected | MSRDC Rejects Sudhagad MNS Demand

esakal

Updated on: 

पाली : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर येथील टोल सुधागड तालुक्यातील नागरिकांसाठी माफ करण्याची सुधागड मनसेची मागणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने फेटाळून लावली आहे. महामंडळाच्या या भूमिकेमुळे सुधागड वासियांमध्ये तीव्र नाराजी असून, या संदर्भात मनसे लवकरच पुढील दिशा ठरवून तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसे सुधागड तालुका अध्यक्ष सुनील साठे यांनी बुधवारी (ता. 25) दिला आहे.

Loading content, please wait...