खारघरमधील बालिकेच्या कुटुंबाला पोलिस संरक्षण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 डिसेंबर 2016

अलिबाग : बालिकेला मदतनीस महिलेकडून मारहाण झाल्याप्रकरणी खारघरमधील "पूर्वा डे केअर'च्या संचालिका प्रियंका निकम यांचा जामीन रद्द करावा, असा अर्ज पोलिसांनी जिल्हा न्यायालयात केला आहे. त्यावर शुक्रवारी (ता. 9) पुढील सुनावणी होणार आहे. तक्रारदार पालकाला संरक्षण देण्याचा आदेशही त्यांनी पोलिसांना दिला

अलिबाग येथील जिल्हा न्यायालयात न्यायाधीश ए. सावंत यांनी बुधवारी या अर्जावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले. "पूर्वा डे केअर'मध्ये बालिकेला मारहाण करण्यात आली होती. पाळणाघरात कामाला असणाऱ्या अफसाना हिने ही मारहाण केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. याप्रकरणी अफसाना व पाळणाघरच्या संचालिका निकम यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पनवेल न्यायालयाने निकम यांना जामीन मंजूर केला आहे. अफसाना न्यायालयीन कोठडीत आहे.
निकम यांचा जामीन रद्द करावा, यासाठी पोलिसांनी जिल्हा न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावर दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश सावंत यांनी पुढील सुनावणी 9 डिसेंबरपर्यंत राखून ठेवली.

या प्रकरणातील तक्रारदार रुचिता सिन्हा यांनी आपणास आरोपी निकम कुटुंबीयांकडून धोका असल्याचे म्हणणे न्यायालयात मांडले. आरोपी व आपण एकाच परिसरात राहतो. त्यामुळे त्यांच्यापासून आपणास धोका उद्‌भवू शकतो, असा दावा केला. त्यावर न्यायालयाने सिन्हा कुटुंबीयांना संरक्षण देण्याचे आदेश पोलिसांना दिले. सरकार पक्षातर्फे प्रसाद पाटील यांनी बाजू मांडली.

Web Title: kharghar daycare child given police security