

Mumbai-Goa Highway Toll Controversy: Kharpada Plaza Sparks Public Outrage
esakal
-अमित गवळे
पाली: तब्बल 16 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (NH-66) काम अद्याप पूर्ण झालेले नसतानाही, रायगड जिल्ह्यातील खारपाडा येथील टोल नाका अचानकपणे सुरू करण्यात आल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. महामार्गाची दुरवस्था कायम असताना प्रशासनाने अचानक टोल वसुली सुरू करून जनतेच्या जखमेवर मीठ चोळल्याची भावना निर्माण झाली आहे. या मनमानी कारभाराविरोधात संपूर्ण रायगड जिल्ह्यातून तीव्र संताप आणि प्रचंड उद्रेक पाहायला मिळत आहे.