खेड : निचरा नाही रस्ता गेला पाण्याखाली! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water

खेड : निचरा नाही रस्ता गेला पाण्याखाली!

खेड : गेले चार दिवस झालेल्या पावसामुळे लोटे-परशुराम औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ता पाण्याखाली गेला असून, वाहतुकीची गैरसोय झाली आहे.गेले अनेक दिवस हुलकावणी देणाऱ्‍या वरुणराजाने दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी कासावीस झालेल्या लोकांना वातावरणात गारव्याने दिलासा दिला आहे; मात्र त्याचवेळी लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ता पाण्याखाली गेल्याने अनेक वाहनचालक व पादचाऱ्‍यांना या मार्गावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे.

आवाशी -गुणदे फाट्यानजीक असणाऱ्‍या एमको पेस्टिसाईड कंपनीसमोरून जाणार्‍या एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यावर सीईटीपीसमोर व एसआरड्रग्स कंपनीजवळच्या मार्गावरील रस्ता पाण्याखाली गेला आहे. या ठिकाणी पूर्वेकडील बाजूस युएस व्हिटॅमिन कंपनीचा सोलर प्लॅन्ट व बॉयलर हाऊस असून लगतच अन्य एका कंपनीचे गोडाऊन आहे. त्याचबरोबर पश्‍चिमेकडील बाजूस महामार्ग लागून आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मार्गच नसल्याने हे पाणी रस्त्यावरच साचून राहत आहे.

तरीही परिस्थिती जैसे थे

मागील दोन वर्षांपासून याकडे एमआयडीसीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असूनही परिस्थिती जैसे थे आहे. अजून पावसाळ्याचे काही महिने शिल्लक असून, आतातरी एमआयडीसीने ही समस्या दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Khed Drain Road Went Under Water

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..