आधुनिक शिक्षणामुळे जवानांची संख्या कमी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

खेड - रत्नागिरी, सातारा व सांगली या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग सैन्यदलात दाखल होत असे. परंतु ही परंपरा आजच्या घडीला मागे पडली आहे, अशी माहिती शिवतर येथील नारायण बाबाजी मोरे यांनी दिली. नारायण मोरे हे  १९६१ ला सैन्यदलात भरती झाले. आपल्या वंशजांची परंपरा चालवित सैन्यात जाण्याची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. यावेळी त्यांनी  कठीण परिस्थितीत देखील सैन्यदलात भरती होण्याचा चंग बांधला होता. १९६१ ला सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात उत्तम भूमिका बजावली होती.

खेड - रत्नागिरी, सातारा व सांगली या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग सैन्यदलात दाखल होत असे. परंतु ही परंपरा आजच्या घडीला मागे पडली आहे, अशी माहिती शिवतर येथील नारायण बाबाजी मोरे यांनी दिली. नारायण मोरे हे  १९६१ ला सैन्यदलात भरती झाले. आपल्या वंशजांची परंपरा चालवित सैन्यात जाण्याची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती. यावेळी त्यांनी  कठीण परिस्थितीत देखील सैन्यदलात भरती होण्याचा चंग बांधला होता. १९६१ ला सैन्य दलात भरती झाल्यानंतर त्यांनी १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात उत्तम भूमिका बजावली होती. यापूर्वी सैन्यदलात जाण्यासाठी युवकांची मोठी फौज असायची, परंतु सद्य:स्थितीत युवकांचा सैन्यदलात जाण्याचा ओढा फारच कमी आहे. 

बदलती शिक्षण पद्धती इंजिनिअरिंग, डॉक्‍टर, वकील, संगणक यांसह अन्य क्षेत्राकडे युवकांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे.  बदलती कुटुंबपद्धती देखील काहीअंशी या साऱ्या गोष्टींना कारणीभूत आहे. पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीमूळे आपला मुलगा सैन्यदलात गेला तरी इतर नातेवाईक सोबत असायचे. परंतु, विभक्त कुटुंबपद्धतीमुळे आपला मुलगा आपल्या सोबतच राहावा. 

तोच  सैन्यात गेला तर आपल्याला कोण सांभाळेल? असा आई-वडिलांना वाटते. सैन्य दलात गेल्यानंतर आपली पत्नी किंवा मुले यांच्याकडे कोण लक्ष देईल, असा प्रश्‍न पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमुळे पडत नव्हता. हल्लीचा तरुण हा सैन्य दलात जाताना या विचारांनी नाही म्हटले तरी कचरतो. शिवाय कोल्हापूर, पुणे यासारख्या ठिकाणी सैन्यदलाची भरती प्रक्रिया पार पडते. एकतर अवघड प्रक्रिया सर्व शारीरिक चाचण्या व खूप दूरचे अंतर त्यामुळे कोकणातील तरुण वर्ग त्या ठिकाणी जाण्यासाठी दुर्लक्षच करताना दिसून येत आहेत. 

खेड तालुक्‍यातील शिवतर, चिरणी, खोपी, शिरगाव, अस्तान, गुणदे, आवाशी, वडगाव, बिरमणी, तिसंगी या गावातून मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग हा सैन्यदलात कामगिरीवर आहे. 

शासनाने प्रोत्साहन देण्याची गरज
शासन स्तरावरून सद्य:स्थितीतील युवकांना प्रोत्साहन देत ग्रामीण भागासह तालुक्‍यातील युवकांना एकत्र करून त्यांना सैन्यदलात भरती होण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. त्या युवकांमध्ये सैन्यदलात भरती होण्यासाठी जाणीव-जागृती करणे हे शासनाचे काम आहे. आपल्या देशाचा प्रत्येक तरुण हा आपल्या मायभूमीच्या संरक्षणासाठी नेहमीच सज्ज असणे आवश्‍यक आहे, अशी प्रतिक्रिया नारायण बाबाजी मोरे यांनी दिली.

Web Title: khed konkan news Modern education has reduced the number of soldiers