नातूवाडी, पिंपळवाडी धरणे महिनाभरात भरणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

खेड - तालुक्‍यात पाणीटंचाईच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नातूवाडी व पिंपळवाडी धरण क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस होत आहे. तालुक्‍यात आतापर्यंत १२३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, असाच पाऊस झाल्यास दोन्ही धरणे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने भरतील, अशी शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

उन्हाळ्यातील खरीप हंगामाच्या शेतीसह पाणीटंचाई काळात महत्त्वाची भूमिका बजावणारी ही धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास खेड तालुकावासीयांवरील पुढील वर्षी पाणीटंचाईचे सावटच येणार नाही, असा अंदाज या क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. या  धरणाप्रमाणेच तालुक्‍यातील बोरज, कोंडिवली या धरणांतदेखील मुबलक पाणीसाठा होत आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या नातूवाडी व पिंपळवाडी धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याद्वारे हजारो एकर शेती ओलिताखाली येते. त्यामुळे  शेतकऱ्यांना वर्षातून दोन वेळा शेतीचे उत्पन्न घेता येते. या गावासह लगतच्या गावांना पाणीटंचाई जाणवत नाही. टंचाई काळात खेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी धरणातील ८ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित ठेवून शहरवासीयांची तहान भागवली जाते. तालुक्‍यातील खोपी येथील पिंपळवाडी डुबी प्रकल्प धरण क्षेत्रातही समाधानकारक पाऊस पडत आहे.

खोपी पिंपळवाडी (डुबी) पाटबंधारे प्रकल्प
धरणाची लांबी - ६३३ मीटर तर उंची ५०.८४ मीटर  
एकूण पाणीसाठा - २७.५९ द.ल.घ.मी.
सिंचन क्षमता - १३३६ हेक्‍टर (२४७२ हेक्‍टर पीकक्षेत्र )

नातूवाडी धरण लघुपाटबंधारे प्रकल्प
धरणाची लांबी - ९०० मीटर, उंची ४७.२५
एकूण पाणीसाठा - २८.०८ द.ल.घ.मी
सिंचन क्षमता - २३९० हेक्‍टर (२१३९ हेक्‍टर)

Web Title: khed konkan news natuwadi, pimpalwadi dam full in month