उमेदवारी रोखण्यासाठी कागदपत्रेच गायब

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

खोपोली - हाळ गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी गटाचे उमेदवार उभे राहू नयेत, या हेतूने गावातील तीन जणांनी इतर सर्व संभाव्य आदिवासी उमेदवारांची निवडणूक लढविण्यासाठी लागणारी कागदपत्रे गायब केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आदिवासींच्या तक्रारीवरून खालापूर पोलिसांनी गावातील तीन जणांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

खालापूर तालुक्‍यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका 14 ऑक्‍टोबरला होणार आहेत. हाळ ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते चंदर राम वाघमारे, रवींद्र लक्ष्मण वाघमारे, रामदास करकरे या त्रिकुटाने गावातील आदिवासी कुटुंबांची सर्व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली. हा प्रकार राजकीय हेतूने केल्याचे लक्षात येताच येथील सर्व आदिवासींनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: khopoli konkan news Documents to prevent candidature are missing