

heritage infrastructure
sakal
राजापूर : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर हे कोकणातील एक प्राचीन व ऐतिहासिक नगर असून, १९व्या शतकात येथे आधुनिक नागरी सुविधांची पायाभरणी झाली. या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे शहरातील नळाद्वारे पाणीपुरवठा योजना. या योजनेला त्या काळातील प्रगत नागरी विकासाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून १०० वर्षांनंतरही सांगता येते, अशी माहिती इतिहास अभ्यासक धनंजय मराठे यांनी दिली.