मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात; एकजण जागीच ठार

भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला.
Shikhar Shingnapur Car Accident
Shikhar Shingnapur Car Accidentesakal

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकी व मोटारीत झालेल्या भीषण अपघातात एकजण जागीच ठार झाला तर अन्य एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज सायंकाळी येथील आरएसएन हॉटेलसमोर झाला. भूषण देसाई (वय 33 रा. पाट) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर कुडाळातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, औंरगाबाद येथील प्रवासी मोटारीने गोव्यावरुन मालवणच्या दिशेने जात होते. ते सायंकाळी कुडाळ आरएसएन हॉटेलकडे आले असता यावेळी त्यांची मोटार व दुचाकीत भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील भूषण देसाई हे जागीच ठार झाले तर मंगेश वाईरकर हे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलीस अधिकारी सागर शिंदे यांनी भेट देऊन पंचनामा केला. भूषण देसाई यांचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पाट विद्यालयात ते संगणक विभागात काम करीत होते.

Shikhar Shingnapur Car Accident
Omicron : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी RT-PCRचे प्री-बुकिंग अनिवार्य

नागरिकांचा रास्ता रोको

आरएसएन हॉटेलसमोर सुरक्षिततेबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने गेल्या काही दिवसात सातत्याने या ठिकाणी भीषण स्वरूपाचे अपघात झाले आहेत. आजच्या अपघाताने त्यात अधिक भर पडली आहे. यामुळे कुडाळातील संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com