esakal | मच्छीमारांनो समुद्रात जाताय ? मग थोडं जपुनच, तुमच्यासाठी महत्वाची सूचना
sakal

बोलून बातमी शोधा

in kokan between three days the possibility of heavy rain fishermen know about the situation in ratnagiri

किनारी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला आहे.

मच्छीमारांनो समुद्रात जाताय ? मग थोडं जपुनच, तुमच्यासाठी महत्वाची सूचना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी हलका पाऊस सुरू आहे. अधूनमधून पडणाऱ्या सरींमुळे वातावरणही थंड आहे. किनारी भागात वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला आहे. हवामान विभागानेही १६ सप्टेंबरपर्यंत कोकणात जोरदार पावसाची शक्‍यता वर्तवली आहे. मच्छीमारांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यात रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत सरासरी १९.०८ मिमी पाऊस झाला.  

हेही वाचा - सव्वाआठ पैकी सव्वाच दिलात, आता आम्ही मुलांना बसवायचे तरी कुठे ?

त्यात मंडणगड-१९.५०,  दापोली- ५.९०, खेड- २८.७०, गुहागर- १८, चिपळूण- २२.४०, संगमेश्वर-१८.३०, रत्नागिरी- २५.५०,  लांजा- २५.१०, राजापूर- ८.३० मिमी नोंद झाली. शुक्रवारी रात्रीपासून पाऊस सुरु झाला. शनिवारी सकाळी संततधार सुरू होती. दुपारनंतर जोर ओसरला. रविवारी सकाळपासून दमदार सरी कोसळत आहेत. पाऊस थांबला तरीही वातावरण ढगाळच होते. समुद्र खवळला असला तरीही रत्नागिरी तालुक्‍यातील काही मच्छीमारी नौका रविवारी मासेमारीसाठी रवाना झाल्या होत्या.

हेही वाचा -  एसटीला मिळणार ऊर्जितावस्था ; आता राज्यभरात उभारणार पेट्रोलपंप, कोकणचाही समावेश 

हर्णै येथील काही नौका सुरक्षिततेसाठी जयगड बंदरात दाखल झाल्या आहेत. कोकण किनारपट्टीवरील सुरक्षित बंदरे म्हणून मिरकरवाडा आणि जयगडची ओळख आहे. त्यामुळे अनेक नौका वादळाची परिस्थिती असेल तर या ठिकाणी दाखल होतात. दरम्यान, जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्‍टर वर हळव्या बियाण्यांची लागवड ते. ही बियाणे १०५ ते ११० दिवसात कापणी योग्य होतात.  त्याप्रमाणे हळवा भात येत्या दहा दिवसात कापणीसाठी तयार होणार आहेत. पावसामुळे पीक आडवे होण्याची शक्‍यता आहे.

संपादन - स्नेहल कदम 

loading image