esakal | एसटीला मिळणार ऊर्जितावस्था ; आता राज्यभरात उभारणार पेट्रोलपंप, कोकणचाही समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

small petrol pump, CNG, diesel start in state for ST and included rajapur ratnagiri

एसटी पुन्हा नफ्यामध्ये आणण्यासाठी, ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. उत्पन्न वाढीसाठी नवनवीन उपक्रमही राबविले जात आहेत.

एसटीला मिळणार ऊर्जितावस्था ; आता राज्यभरात उभारणार पेट्रोलपंप, कोकणचाही समावेश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर : अपुऱ्या भारमानासह विविध कारणांमुळे तोट्यात असलेल्या एसटी विभागाला ऊर्जितावस्थेसाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यातून, एसटी महामंडळ स्वतःच्या जागेमध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी गॅसचे किरकोळ विक्री केंद्र उभारणार आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या खासगी तेल कंपनीच्या सहभागातून हे पेट्रोल पंप राज्यभरामध्ये उभारण्यात येणार असून, त्यामध्ये राजापूर व रत्नागिरी आगाराचा समावेश आहे.

हेही वाचा - धक्कादायक : म्हशीच्या पोटात चक्क ४५ किलोचा कचरा 

या अनुषंगाने राजापूरच्या पंपासाठी येथील आगारालगत महामार्गावर आगारप्रमुखांच्या बंगल्याच्या परिसरातील जागेची नुकतीच पाहणी केल्याची माहिती आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी दिली. येथील आगारप्रमुख पाथरे यांच्यासह इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. चे अधिकारी कुशल त्रिपाठी, आशिष जैन, विभागीय अभियंता आदिती इनामदार, विभागीय भांडार शाखेचे साळवी आदींच्या उपस्थितीमध्ये ही जागेची पाहणी झाली. गाड्यांच्या फेऱ्यांना न मिळणारे पुरेसे भारमान, खासगी वाहतुकीसोबत करावी लागणारी स्पर्धा आदी विविध कारणांमुळे एसटी विभाग गेल्या काही वर्षामध्ये तोट्यात आहे. 

एसटी पुन्हा नफ्यामध्ये आणण्यासाठी, ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. उत्पन्न वाढीसाठी नवनवीन उपक्रमही राबविले जात आहेत. हे उपक्रम राबवित असताना स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये पेट्रोल व डिझेल विक्री केंद्र उभारणार आहे. ज्या आगारांमध्ये त्यासाठी जागा उपलब्ध आहे, त्या ठिकाणी अशा प्रकारे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि. या खासगी तेल कंपनीच्या सहभागातून एसटी महामंडळ हे पंप उभारणार आहे.

हेही वाचा - महिलेला २५ लाख रुपयांची लॉटरी पडली महागत 

आगारप्रमुखांच्या नेतृत्वाखाली

महामंडळाची जागा निश्‍चित केलेल्या जागेची पाहणी करून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन तेथे आवश्‍यक ते बांधकाम करून सेवासुविधा निर्माण करून पंप उभारला जाणार आहे. त्याबाबतचा आवश्‍यक असलेला करार एसटी महामंडळ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीशी करणार आहे. या ठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी गॅसची विक्री केली जाणार आहे. त्याची सेवा या ठिकाणी सर्वसामान्यांनाही मिळणार आहे. त्या-त्या ठिकाणी आगारप्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम चालणार असून एसटीच्या तांत्रिक कार्यशाळेतील कर्मचारी या ठिकाणी काम करणार आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

loading image