esakal | कोकण : अजून किती नौकांची जलसमाधी?
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण : अजून किती नौकांनी जलसमाधी?

गेले कित्येक वर्षांपासून आंजर्ले खाडीतील साचलेला गाळ काढण्याचा रखडलेला प्रस्ताव मंजूर होऊन निधी आलेला असताना अजून कामाला सुरवात होत नाही.

कोकण : अजून किती नौकांची जलसमाधी?

sakal_logo
By
राधेश लिंगायत

हर्णै : गेले कित्येक वर्षांपासून आंजर्ले खाडीतील साचलेला गाळ काढण्याचा रखडलेला प्रस्ताव मंजूर होऊन निधी आलेला असताना अजून कामाला सुरवात होत नाही, तसेच शासनाला अजून किती नौकांची जलसमाधी बघायची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मच्छीमार बांधवांकडून येत आहेत. रोजच्या लाखो रुपयांच्या उलाढालीमुळे हर्णै बंदर हे रत्नागिरी जिल्ह्यातील क्र. २ चे बंदर समजले जाते. अजूनही हे बंदर पूर्णपणे सुरक्षित बंदर नाही. इथला कित्येक वर्षे मागणी असलेला जेटीचा प्रस्ताव अजूनही सरकार दरबारी धूळ खात आहे.

त्यामुळे हर्णै या गावासह, पाजपंढरी, आडे, उटंबर, केळशी, बुरोंडी, दाभोळ, कोळथरे आदी गावातील मच्छीमार व्यावसायिकांच्या किमान ८५० परवानाधारक नौकांना वातावरणाच्या बदलामुळे उद्भवणाऱ्या चक्रीवादळाच्या काळात अथवा पावसाळ्यात किंवा दुरुस्तीच्या कारणास्तव हर्णै बंदरापासून जवळच असलेल्या आंजर्ले, अडखळ खाडीत सुरक्षित शाकारण्यासाठी घेऊन यावे लागते. परंतु आंजर्ले खाडीच्या मुखावरच प्रचंड गाळ साचला आहे. खाडीच्या मुखावरचा भाग गाळाने भरला असल्यामुळे नौका खाडीत आणताना या मच्छीमारांना तारेवरची कसरत करावी लागते. ही कसरत करतानाच गेल्या दोन वर्षात या खाडीत तीन बोटींना जलसमाधी मिळाली.

हेही वाचा: वर्धा नदीत नाव उलटून ११ जण बुडाले, तिघांचे मृतदेह सापडले

दोन दिवसांपूर्वी पाजपंढरी येथील एक नौका पूर्णपणे बुडाली आणि हर्णैमधील दुसऱ्या दोन नौका बुडता बुडता मच्छीमार बांधवांनीच वाचवल्या. आंजर्ले खाडीतील मुखाशी असलेला गाळ निघाला असता तर दरवर्षी येथील मच्छीमार बांधवांच्या नौकांचे होणारे नुकसान थांबले असते. दरवर्षी आंजर्ले खाडीतील गाळ निघेल म्हणून सांगण्यात येत आहे. निधी मंजूर आहे मग गाळ काढण्यास घोडे आडले कुठे ? असा सवाल मच्छीमार करत आहेत.

हेही वाचा: दिवाळीपूर्वीच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा होणार PFचे व्याज?

आमदार कदम यांनी पाहणी केली

आमदार योगेश कदम यांच्याकडे येथील मच्छीमारांनी वारंवार कैफियत मांडली. हा गाळ काढण्यासाठी व या ठिकाणी ग्रोएन्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी अधिवेशनामध्ये बजेटमधून मागणी लावून धरली असता ५६ कोटींचा निधी मंजूरही केला आहे. या कामाची संबधित खात्याच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वतः आमदार कदम यांनी पाहणीदेखील केली आहे.

loading image
go to top