Konkan: न.पं.ची निवडणूक जाहीर; पक्षांची धांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी

दापोली : न.पं.ची निवडणूक जाहीर; पक्षांची धांदल

दाभोळ : दापोली नगरपंचायतीची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली असून या निवडणुकीची आचारसंहिता कालपासून (ता. २४ ) चालू झाली आहे. एवढ्या लवकर निवडणूक जाहीर होईल, अशी कल्पना राजकीय पक्ष व प्रशासनालाही नसल्याने आता सर्वांची धांदल उडाली आहे. दापोली नगरपंचायतीच्या २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी शिवसेना व भाजप यांनी ही निवडणूक स्वबळावर तर राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांनी आघाडी करून ही निवडणूक लढवली होती.

त्यात ७ जागांवर शिवसेना, ४ राष्ट्रवादी, ४ कॉंग्रेस व २ भाजपा असे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा शिवसेना व भाजप यांची युती असल्याने शिवसेनेचे ७ व भाजपचे २ सदस्य मिळून नगरपंचायतीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी शिवसेनेकडून भाजपकडे विचारणा करण्यात आली होती; मात्र भाजपने त्याला नकार दिला होता तर राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भाजप यांनी एकत्र येऊन भाजपचा नगराध्यक्ष तर कॉंग्रेसला उपनगराध्यक्ष पद देऊन सेनेला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी तत्कालीन आमदार संजय कदम यांनी घोषणा केली होती; मात्र कॉंग्रेसला यात विश्वासात न घेता घोषणा केल्याने कॉंग्रेसने त्याला नकार दिला होता.

हेही वाचा: आता विभाजीत भारताला अखंडित बनवायला हवं - मोहन भागवत

कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप व शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी चर्चा करून शिवसेना व कॉंग्रेस यांच्यात प्रासंगिक करार करून शिवसेनेला नगराध्यक्षपद तर कॉंग्रेसला उपनगराध्यक्षपद व विषय समित्या अशी तडजोड करून दापोली नगरपंचायतीत सत्ता स्थापन केली व ५ वर्षे ही सत्ता कायम राहिली.

कॉंग्रेसने राष्ट्रवादीसोबतची आघाडी तोडून शिवसेनेसोबत केलेल्या प्रासंगिक करारामुळे राष्ट्रवादीने त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कॉंग्रेससोबत आघाडी केली नाही. त्यामुळे झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

निवडणूक कार्यक्रम

उमेदवारी अर्ज स्वीकारणे १ ते ७ डिसेंबर २०२१

उमेदवारी अर्जांची छाननी ८ डिसेंबर

अर्ज मागे घेण्याची अंतिम तारिख १३ डिसेंबर

मतदान २१ डिसेंबर

मतमोजणी २२ डिसेंबर

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

भाजप, राष्ट्रवादी एकत्र येणार..?

आत्ता होणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीतही राज्यात महाविकास आघाडी असली तरी दापोली नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी त्यात सामील होणार नाही व शिवसेना व कॉंग्रेस ही निवडणूक एकत्र लढवण्याची चिन्हे असून भाजप, राष्ट्रवादी एकत्र येऊन ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

loading image
go to top