राणेंना मंत्रीपद मिळाले तर जिल्ह्याला चांगले दिवस: साळगावकर

अमोल टेंबकर
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

बबन साळगावकर यांनी माजी आमदार तथा भाजपाचे नेते शिवराम दळवी यांच्याची बोलताना भावना व्यक्त केल्या. नगरसेवक सुरेद्र बांदेकर, विनायक दळवी यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी येथिल पाटेकर देवस्थानात आयोजित कार्यक्रमात चर्चा झाली. राणेंचा भाजप प्रवेश आता अंतिम मानला जात आहे.

सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे. आता पुन्हा जिल्ह्याला चांगले दिवस येणार असा विश्वास नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी व्यक्त केला. 

बबन साळगावकर यांनी माजी आमदार तथा भाजपाचे नेते शिवराम दळवी यांच्याची बोलताना भावना व्यक्त केल्या. नगरसेवक सुरेद्र बांदेकर, विनायक दळवी यावेळी उपस्थित होते. सावंतवाडी येथिल पाटेकर देवस्थानात आयोजित कार्यक्रमात चर्चा झाली. राणेंचा भाजप प्रवेश आता अंतिम मानला जात आहे. काल येथे आलेले बांधकाममंत्री चद्रकांत पाटील यांनी प्रवेशाचा मुहूर्त नाही, मात्र ते आल्यास आपण माझे मंत्रीपद सुध्दा देईन असे सांगितले होते. 

दरम्यान आज येथील पाटेकर देवस्थानात साळगावकर यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर दळवी यांच्याशी चर्चा करताना साळगावकर यांनी राणे प्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. साळगावकर यांनी एकेकाळी राणेंसोबत शिवसेनेत काम केले आहे. आता मात्र ते पालकमंत्री तथा राणेचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या गृहमंत्री दीपक केसरकर यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जातात. दरम्यान साळगावकर यांनी असे वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावणार आहेत.

Web Title: Kokan news Baban Salgaonkar talked about Narayan Rane