देवरुख: एकही गाडी न सुटल्याने प्रवाशांचे हाल

प्रमोद हर्डीकर
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

ऐन दिवाळीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने इतर संघटनांचा पाठींबा मिळवत संपाचे उगारलेले हत्यार यशस्वी झाले माञ यात प्रवाशांना अतोनात हालाला सामोरे जावे लागले आहे.

साडवली (रत्नागिरी) : महाराष्र्ट राज्य एसटी महामंडळातील कामगार संघटना, महाराष्ट्र एसटी वर्कर्स (इंटक) देवरुख आगाराने सोमवारी मध्यरात्रीपासून संप सुरु केला. देवरुख आगारात हा संप १००% यशस्वी झाल्याचा दावा दोन्ही संघटनांनी केला आहे. देवरुख एसटी आगारातून चालक वाहक, कर्मचारी यांनी संपात सहभाग नोंदवल्याने मंगळवारी पहाटेपासून एकही एसटी आगाराबाहेर गेली नाही.

देवरुख आगार व्यवस्थापकांनी मध्यरात्रीच कामगार संघटना व कर्मचारी संघटना यांनी संपात सहभागी होऊ नये अशा नोटीसा आगारात लावल्या होत्या तसेच उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालकयांचेकडून आलेले निवेदनही ध्ननीक्षेपकावर जाहिर करण्यात आले.

ऐन दिवाळीत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने इतर संघटनांचा पाठींबा मिळवत संपाचे उगारलेले हत्यार यशस्वी झाले माञ यात प्रवाशांना अतोनात हालाला सामोरे जावे लागले आहे.

देवरुख एसटी आगारात एकुण ४६७ कर्मचारी आहेत .यामध्ये चालक १६४,वाहक १२९,प्रशासकीय कर्मचारी १३४,व कार्यशाळा कर्मचारी ४९ अशी ही संख्या आहे.
देवरुख आगारातील संपामुळे पहाटे४.४५ ला जाणारी रेल्वे कनेक्शन,५वाजता देवरुख संगमेश्वर अक्कलकोट,तसेच कुचांबे,वत्यानंतरच्या नियोजित वेळेच्या गाड्या सोडण्यात आलेल्या नाहित.यामुळे रेल्वेने मुंबईला जाणारे प्रवाशी संगमेश्वर रेल्वे स्टेशनला जावू शकले नाहीत तर संगमेश्वर बेळगाव गाडीचे आरक्षण केलेले प्रवाशीही देवरुख आगारातच अडकले.आरक्षण केले पण गाडी नाही या प्रकारामुळे प्रवासी हैराण झाले.

काही प्रवाशांना संप होणार हे माहित असल्यामुळे त्यांनी घराबाहेर न पडणे पसंद केले. नेहमी पहाटेपासुन गजबजुन जाणारा देवरुख एसटी आगाराचा परिसर सुना सुना वाटत होता. सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू करावा अशी मागणी महाराष्ट्र एसटी संघटनेकडून एसटी महामंडळाकडे करण्यात आली आहे.त्यामूळे गेल्या दिड वर्षापासून नविन वेतन करारही थांबला आहे.या अशा अनेक मागण्पांसाठीहा संप झाला आहे.मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीतुन ठोस असे काही पदरात न पडल्याने सोमवारी मध्यराञीपासुनच एस.टी,ची पळणारी चाकेथांबली आहेत.

हा संप मोडीत काढण्यासाठी महामंडळाकडूनबरेच प्रयत्न होत आहेत.कायदेशीर कारवाई करण्याचा तसेच बडतर्फ करण्याचा इशारा देण्यात आला आहे. देवरुख, संगमेश्वर, साखरपा, माखजन येथून एकही एसटी न सुटल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.वस्तीला गेलेल्या व मुख्याशहरातून सोमवारी राञी सुटलेल्या गाड्या देवरुख आगारात दाखल झाल्या आहेत.या गाड्यातून आलेल्या प्रवाशांना ग्रामिण भागात जाण्यासाठी रीक्षा व खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागला यामध्ये या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.

ऐन दिवाळीत हा संप सुरु झाल्याने ग्रामिण भागातून देवरुख बाजारपेठेत येणारा ग्राहकच न आल्याने बाजारपेठेवरही याचा मोठा परीणाम जाणवला.

Web Title: Kokan news ST workers strike in Devrukh