अादिवासी वाड्या वस्त्यांवर गृहोपयोगी वस्तूंचे वाटप

अमित गवळे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

जाॅय अाॅफ हॅप्पीनेसची मोलाची साथ
नंदु चव्हाण यांच्या संकल्पनेतील जाॅय अाॅफ हॅप्पीनेस सोबत दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातुन चार वर्षांपासुन हा उपक्रम राबविण्यात येतो. पहिल्या वर्षी २०१४ ला गृहोपयोगी वस्तु वाटप, २०१५ ला सोलर लँम्प, २०१६ ला वॅाटर फिल्टर असे उपक्रम माणगाव, खोपोली,नाशिक, कोल्हापुर, लातुर सारख्या आदिवासी, गरीब वाड्यात राबविण्यात आले.

पाली : गड किल्ले संवर्धनाबरोबरच दुर्गवीर प्रतिष्ठान जाॅय अाॅफ हॅप्पीनेस या संस्थेच्या माध्यमातून मागील चार वर्षांपासून दिवाळीत अादिवासी व गरजुंना शालेय व गृहोपयोगी वस्तूंचे वाटप करत आहे. नुकतेच सुधागड तालुक्यात नाडसूर आदिवासी वाडी, मृगगड कवलोशी, माणगाव तालुक्यातील हर्णे आदिवासी वाडी, कदंब आदिवासी वाडी, पोलादपुर येथे डिनर सेट, सोलर लॅम्पचे वाटप करुन ग्रंथालये उभारण्यात आले आहे.

या वर्षी प्रत्येकी २०० पुस्तकांसहित २० ग्रंथालये देण्यात येत आहेत. ५०० भांड्यांचे किट यासोबत २०० सोलर दिवे वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम लोकनिधीतुन राबविण्यात येत आहे. दिवाळनिमीत्त या भेटवस्तु देण्याचा उपक्रम या वर्षी मानगाव, खोपोली, नाशिक, कोल्हापूर, लातुर सारख्या आदिवासी, गरीब वाड्यात राबविला जात आहे. विविध माध्यमातुन या उपक्रमासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे या आवाहनाला उत्तम प्रतिसादही मिळतोय. आपणही या उपक्रमासाठी देणगी स्वरुपात मदत करु शकता असे अावाहन दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हसुरकर यांनी केले आहे. 

या उपक्रमास जाॅय अाॅफ हॅप्पीनेसचे नंदू चव्हाण यांच्यासह अजित राणे, सचिन रेडकर, सचिन जगताप, रामजी कदम, निल मयेकर, प्रज्वल पाटील, धीरज लोके अादी पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह अनेकांनी मोलाची साथ देवून सहकार्य केले आहे. अादिवासी, गरिब व गरजू लोकांना गृहोपयोगी वस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहर्यावरील समाधान अविस्मरणीय होते. अनेकांच्या घरात विजच नसल्याने त्यांना सोलर दिव्यांमुळे खुपच दिलासा मिळाला. तर ग्रंथालय अाणि पुस्तकांमुळे अादिवासी वाड्या पाड्यांवरील विदयार्थी व मुलांच्या जिवणात ज्ञानाचा प्रकाश पडला आहे.

संपर्क:- 9833458151, 8097519700, 8655823748

बँक तपशील :- खातेदाराचे नाव- दुर्गवीर प्रतिष्ठाण, बँक अाॅफ बडोदा, शाखा - चांडवकर रोड, खाते क्रमांक - 04060100032343, खाते प्रकार:- बचत, IFSC : BARB0CHANDA

गड किल्ले संवर्धनाबरोबर सामाजिक भान
दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे २००८ पासुन महाराष्ट्रातील दुर्लक्षीत गडकिल्ले संवर्धनाचे कार्य करण्यात येते.गडकिल्ले संवर्धनासोबत आपली संस्कृती, सण याची माहिती करुण द्यावी व त्या माध्यमातुन गडकिल्ले,इतिहास याबाबत जनजागृती व्हावी यासाठी महाराष्ट्र दिन, दसरा, गुढि पाडवा हे सण विविध गडांवर साजरे करण्यात येतात. या सोबतच गडाच्या घे-यातील गरीब,आदिवासी गरजुंना शालेय वस्तु, गृहोपयोगी वस्तु, सोलर दिवे, वॅाटर फिल्टर अशा वस्तु वाटपांचे आयोजन करण्यात येते. असे दुर्गवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष हासुरकर यांनी सकाळला सांगितले

जाॅय अाॅफ हॅप्पीनेसची मोलाची साथ
नंदु चव्हाण यांच्या संकल्पनेतील जाॅय अाॅफ हॅप्पीनेस सोबत दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातुन चार वर्षांपासुन हा उपक्रम राबविण्यात येतो. पहिल्या वर्षी २०१४ ला गृहोपयोगी वस्तु वाटप, २०१५ ला सोलर लँम्प, २०१६ ला वॅाटर फिल्टर असे उपक्रम माणगाव, खोपोली,नाशिक, कोल्हापुर, लातुर सारख्या आदिवासी, गरीब वाड्यात राबविण्यात आले.

Web Title: Kokan news tribal people diwali