esakal | भेटी लागे जीवा, आनंद गगनात मावेना; पंढरपुरी भेटले परशुराम अन् विठुमाऊली
sakal

बोलून बातमी शोधा

kokan people going to pandharpur for magh vari from khed ratnagiri

दोन विष्णू अवतार असलेले श्री विठ्ठल आणि परशुराम यांची भेट झाली आणि भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

भेटी लागे जीवा, आनंद गगनात मावेना; पंढरपुरी भेटले परशुराम अन् विठुमाऊली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : माघीवारीनिमित्त हजारो वारकरी दरवर्षी कोकणातून पंढरपूरला जातात. कोकण दिंडी समाज ऊर्फ भार्गवराम दिंडी यांच्या माध्यमातून शेकडो वर्षे अखंडितपणे सुरू असलेली भगवान श्री परशुराम यांच्या पादुका असलेली पालखी दिंडीच्या माध्यमातून श्रीक्षेत्र परशुराम ते श्रीक्षेत्र पंढरपूर अशी नेण्यात आली. याठिकाणी दोन विष्णू अवतार असलेले श्री विठ्ठल आणि परशुराम यांची भेट झाली आणि भाविकांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

कोरोना महामारीचे संकटामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे भार्गवराम परशुराम देवस्थानच्या वतीने माघीवारीनिमित्त भगवान श्री परशुराम यांची पालखी पंढरपूरला नेण्याबाबत परवानगी मागितली होती. ती मिळाल्यानंतर भगवान परशुराम यांच्या पादुकांची पालखी रथामधून घेऊन प्रताप राजेशिर्के आणि त्यांचे सहकारी पंढरपूरच्या दिशेने निघाले. ठरल्याप्रमाणे चार वस्त्या करून रविवारी सकाळी पालखी घेऊन राजेशिर्के श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचले. चंद्रभागेमध्ये स्नान करून संत नामदेव महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेऊन परशुरामांच्या पादुका मुख्य मंदिरात नेण्यात आल्या. जेथे भगवान श्री परशुराम व भगवान श्री विठ्ठल या दोन विष्णू अवतारांची भेट घडली. 

हेही वाचा - विनामास्क फिरत होते, पर्यावरण प्रेमींनी लढवली भन्नाट शक्कल -

यावेळी विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे प्रांताधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार पुदेलवाड यांनी व मंदिरातील सर्व कर्मचाऱ्यांनी, तसेच रुक्‍मिणी मातेच्या मंदिरातील पुजारी व सर्व कर्मचाऱ्यांनी भगवान श्री परशुरामांच्या पादुकांचे दर्शन घेतले. प्रताप राजेशिर्के, रूपेश राजेशिर्के, सुरेश चाळके, शरद पवार, प्रकाश कदम, अमरदीप परचुरे उपस्थित होते.

संपादन - स्नेहल कदम