esakal | विनामास्क फिरत होते, पर्यावरण प्रेमींनी लढवली भन्नाट शक्कल
sakal

बोलून बातमी शोधा

without mask people give rose in chiplun ratnagiri from other

सुमारे 800 हून अधिक लोकांना गांधीगिरीने मास्क देत त्यांना नियमित मास्क वापरण्याचे आवाहन केले. 

विनामास्क फिरत होते, पर्यावरण प्रेमींनी लढवली भन्नाट शक्कल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : संपूर्ण राज्यभरात कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळू लागले आहे. त्यासाठी राज्य सरकारने विविध बाबींवर निर्बंध लादण्यास सुरवात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर लोकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी येथील पर्यावरण प्रेमी आणि माजी सभापती शौकत मुकादम यांनी राष्ट्रीय महामार्गावर विनामास्क फिरणारे फेरीवाले, वाहन चालक व नागरिकांना गुलाबपुष्प व मास्क देत त्यांचे स्वागत केले. सुमारे 800 हून अधिक लोकांना गांधीगिरीने मास्क देत त्यांना नियमित मास्क वापरण्याचे आवाहन केले. 

गेल्या काही दिवसापासून तालुक्‍यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तालुक्‍यातही दररोज तीन - चार रुग्ण आढळत आहेत. यासाठी प्रशासनाबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांनीही खबरदारी बाळगण्यास सुरवात केली आहे. मात्र अद्यापही लोकांकडून हवी तशी खबरदारी बाळगली जात नसल्याचे दिसून येत आहे. सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर अनेकजण करीत नाहीत.

हेही वाचा - मुख्यमंत्री कोरोना जाऊ देणार नाहीत; फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्री यांना घरीच बसायला आवडतं -

त्यामुळे विनामास्क फिरणाऱ्यांना संकोच वाटावा यासाठी माजी सभापती शौकत मुकादम यांनी विनामास्क फिरणाऱ्यांना गुलाबपुष्प देत त्यांचे प्रथम स्वागत केले. त्यानंतर अशा लोकांना कोरोनाविषयीची माहिती देत मास्कचे वाटप केले. घरातून बाहेर पडताना नेहमी मास्क वापरण्याचे आवाहन केले. या उपक्रमासाठी कळबंस्तेचे सरपंच विकास गमरे, उपसरपंच राजेंद्र महाडीक, आदील मुकादम, मोहन महाडीक, विजय शेट्ये, एकनाथ महाडीक, अमोल कदम आदींनी सहकार्य केले.  
 

संपादन - स्नेहल कदम