एकूणच दापोली मतदारसंघात सुरू असलेल्या या राजकीय उलथापालथीकडे नागरिकांचे लक्ष आहे. रागरंग बघता संजय कदम शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे दिसते.
दापोली : ऐन शिमग्याच्या तोंडावरच राजकीय धुळवडीला सुरुवात झाली असून, माजी आमदार संजय कदम यांची व शिवसेनेचे कोकणचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या भेटीगाठीने दापोली शहरात चर्चेला उधाण आले आहे. शिंदे गटातील प्रवेशाचा मुहूर्त कधी एवढाच प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. कदम यांनी मी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले.