esakal | Ratnagiri : आंबा घाटात आजपासून रेटींग वॉलचे काम
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी

रत्नागिरी : आंबा घाटात आजपासून रेटींग वॉलचे काम

sakal_logo
By
राजेश शेळके : सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : गेली साडे तीन महिने बंद असलेला आंबा घाट अवजड वाहतुकीसाठी सुरू करण्याबाबत मागणी जोरत धरत आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे, अशा दोन ठिकाणी सुमारे साडे चार कोटीची रेटींग वॉल बांधण्यात येणार आहे. त्याचे काम सोमावारपासून (ता. ४) सुरू होणार आहे. भूवैज्ञानिकांमार्फत खचलेल्या भागाची पाहणी करून त्यांचा अहवला आल्यानंतर अवजड वाहतुकीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ट्रान्स्पोर्टधारक आंबा घाट सुरू करण्याबाबत जास्त आग्रही आहेत. रत्नागिरी येण्यासाठी त्यांना अणुस्कुरा घाटातून जास्त अवघड वळणे आणि वाताहात झालेल्या रस्त्यावरून कसरत करून रत्नागिरीत पोहचावे लागत आहे.

हेही वाचा: औरंगाबाद : शिक्षकांचे शंभर टक्के लसीकरण अनिवार्य

तसे निवेदन जिल्हा चालक-मालक असोसिएशनने मंत्री, खासदार आदींनी दिले आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वीच खासदार विनायक राऊत यांनी आंबा घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली. मात्र अवजड वाहतुकीसाठी मार्ग सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसून पर्यायाबाबत पाहणी आणि विचार सुरू आहे. अणुस्कुरा घाटातून वाहतूक वाढल्याने या रस्त्याची दर्दशा झाली आहे. मोठे खड्डे मुरूम टाकून भरावे लागत आहेत. खड्डे अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आंबा घाट सुरू होण्याकडे वाहतुकदारांचे लक्ष आहे.

याबाबत राष्ट्रीय राज्य मार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता ते म्हणाले, आंबा घाटात दोन ठिकाणी रस्ता एका बाजूला मोठ्या प्रमाणात खचला आहे. दरीमध्ये तो भाग घरंगळत गेला आहे. त्यामुळे या मार्गावरून अवजड वाहतुक सुरू करणे मोठ्या जिकिरीचे आणि धोक्याचे आहे. त्यासाठी दोन्ही ठिकाणी रेटींग वॉल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर झाले असून सोमवारपासून (ता. ४) हे काम सुरू होणार आहे.

loading image
go to top