देवगड ते बोरीवली या मार्गावर 'या' बसला चांगला प्रतिसाद

Kokan Sleeper Coach Bus Service In Sindhudurg
Kokan Sleeper Coach Bus Service In Sindhudurg

कणकवली (सिंधुदुर्ग )  : एसटी महामंडळाने खाजगी प्रवासी बस वाहतुकीला स्पर्धा करत नव्याने सुरू केलेल्या स्लीपर कोच बस सेवेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. देवगड ते बोरीवली या मार्गावर ही स्लीपरकोच बससेवा अलीकडे सुरू झाली आहे. या बसला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी अभिजित पाटील यांनी दिली. 

कोकण रेल्वे सुरू झाल्यानंतर कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटी बस सेवेवर मोठा परिणाम झाला. त्यातच खाजगी प्रवासी बस वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली अशा स्थितीत एसटीकडे मुंबई मार्गावरच्या निवडकच बसेस सुरू राहिल्या. यात विजयदुर्ग बोरवली आणि देवगड बोरवली या रातराणी मार्गाचा समावेश आहे. या दोनच मार्गावर नियमितपणे गाड्या धावत होत्या. इतर सावंतवाडी असो कुडाळ, मालवण, कणकवली या आजारातून रातराणी बससेवा बंद झाली होती.

स्लीपर कोच बस सेवेला चांगला प्रतिसाद

हंगामाच्या काळात मात्र प्रवासी एसटीकडे येत होते. महामंडळाच्या ताब्यात नव्याने स्लीपरकोच बस आली आहे. सिंधुदुर्ग एसटी विभागाला दोन गाड्या अलीकडेच प्राप्त झाल्या. या गाड्या सध्या देवगड ते बोरवली आणि बोरिवली देवगड या मार्गावर धावत आहेत. स्लीपरकोच आणि इतर अद्यावत सेवा असल्याने सध्या या गाडीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

एसटी महामंडळाकडे सध्या विविध 7 बससेवा सुरु 

एसटी महामंडळाकडून प्रवाशांच्या गरजेनुसार आणि मागणीनुसार आतापर्यंत विविध बससेवा सुरु आहेत. एसटीकडे सध्या साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलीत शिवशाही, शिवनेरी, अश्‍वमेध अशा विविध बसद्वारे दररोज सरासरी 67 लाख प्रवासी प्रवास करतात.रात्रीच्या वेळेस लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी प्रवाशाी स्लीपर बसेसला प्राधान्य देतात. मध्यम पल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना पुश बॅक आसन व्यवस्था उपयुक्त ठरते. या दोन्ही गरजांचा विचार करून एसटी महामंडळाने 30 पुश बॅक आसने व 15 शयन (बर्थ) असलेली बस सेवेत आणली आहे. या बसचा तिकीट दर (शयन-आसन या दोन्हीसाठी) हिरकणी बस दराएवढा आहे. 

अशी आहे आरामदायी बस

हि आरामदायी शयन-आसन बस  12 मीटर लांबीची असून मजबूत अशा माईल्ड स्टीलमध्ये बांधणी, प्रवाशांना पुरेशी जागा उपलब्ध आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसमध्ये 30 आरामदायी पुश बॅक आसने व 15 शयन (स्लीपर) आसने आहेत. पुढील व मागील बाजूस एलईडी मार्गफलक, चालक कॅबिनमध्ये उद्घोषणा यंत्रणा; आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रवाशांना सावध करण्यासाठी बल्कहेड पार्टीशनर हूटर, मागील बाजूस एक रिव्हर्सिंग कॅमेरा असून त्याची एलईडी स्क्रीन चालक कक्षात आहे. 
 
आरामदायी पुश बॅक सीट्‌स 

बसमधील खालील बाजूस बसण्यासाठी आरामदायी पुश बॅक सीटस देण्यात आलेले आहेत; आसनामागील पाठीमागील बाजूस 250 एमएमपर्यंत पुश बॅक आहेत. प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा दिलेली असून मोबईल ठेवण्यासाठी पाऊच, प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प, प्रत्येक शयन कक्षाला एक कोच, बसमध्ये आग प्रतिबंधक उपकरणे आहेत. त्यामुळे स्लिपरकोच बसला सध्या चांगला प्रतिसाद मिळत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com