कोकणातली पोरं लय हुश्शार ! आधुनिक शेतीसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 30 September 2020

गोबर गॅस प्लॅन्ट प्रात्यक्षिके; आधुनिक शेतीचा ध्यास, अनेक उपक्रम

दाभोळ : कृषी शाखेच्या अंतिम वर्षामध्ये (चौथ्या वर्षामध्ये) शिकत असलेल्या ऋषीकेश गांधी या विद्यार्थ्याने कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोबर गॅस प्लॅन्टवर विविध प्रात्यक्षिके केली आहेत व त्याचे महत्त्व तो शेतकऱ्यांना पटवून देत आहे. अनेक उपक्रम राबवत आहे.

कृषी शाखेच्या अंतिम वर्षामध्ये (चौथ्या वर्षामध्ये) शिकत असलेल्या ऋषीकेश गांधी या विद्यार्थ्याने कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोबर गॅस प्लॅन्टवर विविध प्रात्यक्षिके केली आहेत व त्याचे महत्त्व तो शेतकऱ्यांना पटवून देत आहे. या वेळी त्याला कृषी सहाय्यक दर्शना वरवडेकर व मोहन दुबळे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.

हेही वाचा - अधिकाऱ्यांची गुप्त शाळाभेट ; शिक्षकांची उडाली धावपळ 

कोविड-१९ मुळे सक्तीने मिळालेल्या महाविद्यालयीन सुटीत घरी असलेला ऋषीकेश आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत अनेक उपक्रम राबवत आहे. खेड्यातील नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर आपण कशा प्रकारे करू शकतो, याविषयी ऋषीकेश शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मार्गदर्शन करत असून प्रात्यक्षिक दाखवत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाचे बीज रोवणे व त्यांच्या कौशल्याचा सुयोग्य विकास करून रोजगाराची हमी देणे, हा मुख्य हेतू आहे, असे ऋषीकेशने सांगितले. 

"ऋषीकेशने नवीन शेती पद्धतीचा वापर करून आपण आपला रोजगार कसा निश्‍चित करू शकतो, याविषयी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. त्यामुळे यापुढे आम्ही निश्‍चितच नवीन शेती पद्धतीचा वापर करू."

- शंकर पुळेकर, शेतकरी

 

हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेची निवडणूक पुन्हा लांबली 

 

संपादन - स्नेहल कदम 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kokan student helps to farmers in ratnagiri new activity will help to develop farming in konkan