Kokan: झोपाळ्यावर बसून कोल्हा आला विहिरीबाहेर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झोपाळ्यावर बसून कोल्हा आला विहिरीबाहेर
राजापूर : झोपाळ्यावर बसून कोल्हा आला विहिरीबाहेर

राजापूर : झोपाळ्यावर बसून कोल्हा आला विहिरीबाहेर

राजापूर : गेल्या काही वर्षामध्ये तालुक्याच्या विविध भागात बिबट्या विहिरीत पडण्याच्या घटना घडल्या आहेत. बिबट्यापाठोपाठ आता कोल्हेही विहिरीत पडू लागले आहेत. काल (ता. २३) रात्री शहरातील कुंभारमळा येथील बाळा मांडवकर यांच्या विहिरीत कोल्हा पडला. या कोल्ह्याला वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या साथीने सुखरूप बाहेर काढले.

शहरातील कुंभारमळ्यातील मांडवकर यांच्या विहिरीमध्ये कोल्हा पडल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या आज ता. २५ रोजी सकाळी लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी सागर गोसावी, सहकारी दीपक म्हादये, प्रथमेश म्हादये यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

सुमारे १५ फूट खोल विहिरीमध्ये कोल्हा पायऱ्‍यांवर बसलेला होता. दरम्यान, लोकांनी विहिरीमध्ये पडलेल्या कोल्ह्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या वनविभागाच्या अधिकारी गोसावी आणि सहकाऱ्‍यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने दोरीच्या साहाय्याने फळी बांधून त्या द्वारे तयार केलेला झोपाळा विहिरीमध्ये सोडला. त्या झोपाळ्यावर बसून कोल्हा वर आला. विहिरीतून वरती येताच कोल्ह्याने जंगलामध्ये धूम ठोकली.

loading image
go to top