मिनरल वॉटर प्रकल्पाला कोनशीकरांचा विरोध 

मिनरल वॉटर प्रकल्पाला कोनशीकरांचा विरोध 

सावंतवाडी - कोनशी येथे मिनरल वॉटर प्रकल्पाचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी भूमिपूजन केले आहे. त्या प्रकल्पाला कोनशी व भालावल गावातील लोकांचा तीव्र विरोध आहे. या प्रकल्पासाठी रोज पाच लाख लिटर पाणी उपसा होणार आहे. याला विरोध करण्यासाठी सात जूनला प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल. त्याचे नेतृत्व स्वाभिमान पक्ष करेल, अशी माहिती तालुका "स्वाभिमान'चे अध्यक्ष संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी कोनशी माजी सरपंच नाना सावंत, भालावल उपसरपंच समीर परब, दिलीप गवस, गंगाराम नाईक, विठ्ठल गवस, लक्ष्मण गवस, राजन गवस, भरत सावंत, प्रवीण सावंत, नारायण सावंत, शशिकांत सावंत, दीपक गवस, नानू सावंत, सुधीर सावंत यांसह सुमारे 30 ग्रामस्थ उपस्थित होते. 

श्री. परब म्हणाले, ""कोनशी व भालावल गावची लोकसंख्या प्रत्येकी 600 एवढी आहे. या गावात नैसर्गिक साधनसंपत्ती, फळबागायती व शेती आहे. या शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. या हंगामात पाणी टंचाई देखील जाणवते. कोनशी गावात पाणी मिनरल वॉटर प्रकल्प होऊ घातला आहे. त्याचे पालकमंत्री केसरकर यांनी भूमिपूजन केले. लोकांना विश्वासात घेऊन प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांनी करायला हवे होते. 
मिनरल वॉटर प्रकल्पाचे फायदे तोटे आणि गावातील लोकांचे म्हणणे जाणून घेण्याची गरज होती. कोनशी गावात दैनंदिनी या प्रकल्पासाठी पाच लाख लिटर पाण्याचा उपसा होणार आहे. त्यासाठी 17 बोअर खोदली आहेत. त्यातून पाणी उपसा केले जाईल एवढे मोठ्या प्रमाणात पाणी घेतल्यानंतर पिण्याचे पाणी आणि फळबागायतींसाठी लागणारे पाणी उरणार नाही, असे लोकांना वाटते. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना वणवण करावी लागेल. पाणीसाठा नष्ट होणार असेल तर हा प्रकल्प गावातील लोकांना नको. त्यामुळेच "स्वाभिमान' या प्रकल्पाच्या विरोधात नेतृत्व करणार आहे. लोकांसाठी प्रकल्पविरोधी नेतृत्व स्वीकारले आहे, असे श्री. परब म्हणाले. 

गावाचे प्रशासनाला निवेदन 
यावेळी सरपंच नाना सावंत म्हणाले, ""मागील आठ वर्षांपूर्वी प्रकल्पाचा ठराव ग्रामपंचायतीत झाला; पण त्यावेळची आणि आजची परिस्थिती यात मोठा फरक आहे. वॉटर प्रकल्पासाठी 17 बोअर खोदल्या आहेत. त्यामुळे पाणीसाठे नष्ट होतील. पाणी उगम असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच जवळपास हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाविरोधात पालकमंत्री केसरकर तसेच जिल्हाधिकाऱ्यांना गावाने निवेदन दिले होते.'' 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com