शिवसेना तालुकाप्रमुखांची कोंढेतर्फ राजापूर ग्रामपंचायत निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला 

शिवसेना तालुकाप्रमुखांची कोंढेतर्फ राजापूर ग्रामपंचायत निवडणूकीत प्रतिष्ठा पणाला 

राजापूर - 31 ऑगस्टला होत असलेल्या कोंढेतर्फ राजापूर ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी एका महिला उमेदवाराने माघार घेतल्यामुळे मनाली जितेंद्र तुळसवडेकर व नंदिता नवाळे यांच्यात सरळ सामना होणार आहे, तर उर्वरित जागांसाठी देखील दुरंगी लढती होत आहेत. त्यामुळे जोरदार चुरस निर्माण झाली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होत असल्याने तिला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर यांच्या गावची ही निवडणूक असल्याने शिवसेनेने पूर्ण ताकदीने आपली फौज रिंगणात उतरवली आहे. 

या पंचवार्षिक निवडणुकीत दोन सदस्य बिनविरोध निवडून आल्याने शिवसेनेने दोन्ही जागांवर आपला दावा सांगितला आहे. त्यामुळे सातपैकी पाच जागांसाठी निवडणूक होत असून प्रथमच थेट सरपंचपदासाठी निवडणूक होत आहे.

या व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक एकमध्ये एका जागेसाठी अरविंद अशोक लांजेकर व आशिष शांताराम वारंगे अशी लढत होत आहे. याच प्रभागात प्रगती प्रभाकर कोत्रे ही उमेदवार सर्वसाधारण महिला गटातून बिनविरोध निवडून आली आहे, तर सर्वसाधारण गटामध्ये रामचंद्र अनंत कुवळेकर व सीताराम गुणाजी कोत्रे यांच्यात लढत होत आहे.

प्रभाग क्रमांक दोन मधून सर्वसाधारण स्त्री गटातून सेजल संजय भामत व सिद्धी श्रीकांत लांजेकर यांच्यात लढत होत आहे. याच प्रभागातून अमृता वासुदेव नवाळे या बिनविरोध निवडून आल्या आहेत, तर प्रभाग क्रमांक तीन साठी सर्वसाधारण स्त्री गटातून नेहा नंदकुमार कोळेकर व दक्षता दत्ताराम कोळेकर यांच्यात सामना होत आहे.

सर्वसाधारण गटात सुरेश हिरू बाणे व वसंत सदू कुवळेकर असा सरळ सामना होत आहे. या महिन्याच्या 31 तारखेला मतदान व 3 सप्टेंबरला मतमोजणी पार पडेल व त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी समीर सूद हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहेत, अशी महिती तालुका निवडणूक विभागाने दिली. सध्या कोंड्येतर्फे राजापूर गावातील वातावरण निवडणूकमय बनले आहे. 

दोन महिलांमध्ये सरळ सामना... 
सरपंचपदासाठी यापूर्वी तिघा महिलांनी अर्ज भरला होता. त्यापैकी साधना अरविंद लांजेकर यानी माघार घेतल्याने आता दोन महिलांमध्ये सरळ सामना होत आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या मनाली जितेंद्र तुळसवडेकर व नंदिता रवींद्र नवाळे यांचा समावेश आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com