Fisherman
FishermanSakal

Konkan: वातावरणातील बदलांमुळे मासेमारी झाली कठीण; मासळी जाळ्यात सापडेना; मच्छीमार कुटुंबांवर आर्थिक संकट

मच्छीमारांची स्थिती गंभीर; आर्थिक घडी विस्कटतेय

Ratnagiri: वातावरणातील बदलांचा परिणाम मासे मिळण्यावर होत असून गिलनेटने मासे पकडणाऱ्या छोट्या व्यावसायिकाची स्थिती गंभीर आहे. यावर अवलंबून असणाऱ्या हजारो मच्छीमार कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक कुटुंब मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. या व्यवसायातून दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा पावसाळ्यानंतरच्या तीन महिन्यात ही उलाढाल कमी झाली आहे. त्यामुळे मच्छीमारांची आर्थिक घडी विस्कटली आहे. ऑगस्ट महिन्यापासून पारंपरिक मासेमारीपाठोपाठ पर्ससीननेट मासेमारीही सुरु झाली.

मात्र, मासे मिळण्याचे प्रमाण घटले आहे. वातावरणातील बदलांमुळे मासेमारी नौका किनाऱ्यावरच नांगरुन ठेवण्यात येतात. वातावरण निवळले की मासेमारीसाठी खोल समुद्रात जाऊनही अत्यल्प मासे मिळतात. त्यामुळे त्या फेरीचे गणित विस्कटते.

वातावरणातील बदलांमुळेच मत्स्यसाठ्यांवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून काहींनी अत्याधुनिक यंत्राच्या वापरामुळे किनारी भागात मासे कमी प्रमाणात मिळत असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मासे कमी मिळाले की खलाशांचा खर्चही भागत नाही. मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे निर्यातीवरही परिणाम होत आहे.

डिझेलचा खर्च, बर्फ, खलाशांचा पगार व भत्ता, जाळी व इंजिन दुरुस्ती आदीवर दररोज होणारा भागवण्याचे आव्हान मच्छीमारापूढे आहे. बँकेचे कर्ज तसेच व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या आगाऊ रकमेची परतफेड यासारख्या आवाहनांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सुरवातीला बांगडा मासा काहीप्रमाणात मिळत होता. त्याला किलोला ८० ते ११० रुपये दर मिळाला. त्यामुळे मच्छीमारांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. परंतू बांगड्याचे प्रमाणही घटल्यामुळे मच्छीमारांची चिंता वाढली आहे. गेले चार दिवस ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे किनारी भागात वारेही वाहत आहेत. त्यामुळे मासळी खोल समुद्रात जाते. परिणामी पुढील काही दिवस पुन्हा मासे मिळणे अशक्य असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

मासेमारी हंगामात चांगल्या प्रतीचे मासे मिळत नाहीत. इतर मासे मिळण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे मच्छिमार आर्थिक संकटात सापडून कर्जाच्या ओझ्याखाली अडकत चालला आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
- अभय लाकडे, मच्छीमार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com