
Rain Forecast
esakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला असून आजही दिवसभर जोरदार सरी कोसळल्या; हवामान विभागाने २८ सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
सततच्या पावसामुळे नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांमध्ये व्यत्यय आला असून शेतकऱ्यांची भातपिके मोठ्या संकटात सापडली आहेत.
जिल्ह्यातील सुमारे ३,००० हेक्टरवरील परिपक्व अवस्थेतील भातपीक पावसामुळे नष्ट होण्याची शक्यता आहे; पुढील तीन दिवस यलो अलर्ट दिला आहे.
Sindhudurg Rain : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून आज दिवसभर पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. सततच्या पावसामुळे भातपिकांवरील संकट कायम आहे. हवामान विभागाने उद्या (ता. २८) ऑरेंज अलर्ट दिला आहे.