Konkan Project : पोयनार, न्यू मांडवे धरणांना मान्यता; मंत्री कदम, पोयनारला २६५, न्यू मांडवेला १९५ कोटी
Ratnagiri Dam : कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत पोयनार आणि न्यू मांडवे धरणांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. तब्बल ४६० कोटींच्या निधीमुळे या प्रकल्पांना वेग मिळणार आहे.
रत्नागिरी : कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील पोयनार आणि न्यू मांडवे या दोन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे.