अपंग दुकानदारावर निसर्गही कोपला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 जुलै 2017

चिपळूण - जोरदार वाऱ्यासह आलेल्या पावसाने आज पहाटे रामपूर बाजारपेठेतील दुकान कोसळले. हे दुकान अपंग असलेल्या मुुकुंद चव्हाण यांचे आहे. दुकान कोसळल्याने मोठी वित्तहानी झाली आहे. महसूल विभागाने याचा पंचनामा केला आहे. नशीब रुसलेल्या चव्हाण यांच्यावर निसर्गही कोपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. नशीब जणू त्यांच्या जिद्दीची परीक्षा घेत आहे.

रामपूर येथील वारकरी संप्रदायातील मुकुंद चव्हाण यांचे गेल्या काही वर्षांपासून बस स्थानकासमोर स्टेशनरी व इस्त्रीचे दुकान आहे. रामपुरात आज पहाटे झालेल्या वादळी वाऱ्याने हे दुकान जमीनदोस्त झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतकार्याला सुरुवात केली. मुकुंद चव्हाण यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल विभागाकडे केली आहे.

पंचायत समिती सदस्या अनुजा चव्हाण, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलास चव्हाण, माजी सरपंच प्रकाश वाटेकर, अशोकराव कदम, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख अनिल साळवी, राष्ट्रवादीचे सुधीर चव्हाण, सतीश चव्हाण, शाखाप्रमुख सिद्धी चव्हाण आदींनी घटनास्थळाला  भेट दिली.

रामपूरची लोकसंख्या दोन हजारहून अधिक आहे. तलाठी केवळ दर गुरुवारीच हजेरी लावतात. पावसाळ्यात गावात आपत्तीच्या व त्यामुळे नुकसान होण्याच्या घटना घडतात. काही दिवसांपूर्वीच गोठा कोसळला होता. आपत्ती व्यवस्थापनात महसूलचे कर्मचारी गावात असणे गरजेचे आहे. ग्रामस्थांची दैनंदिन कामे आणि नैसर्गिक आपत्तीमधील घटना लक्षाच घेऊन रामपूरला कायमस्वरूपी तलाठी द्यावा, अशी मागणी सौ. चव्हाण यांनी प्रांताधिकाऱ्यांकडे केली आहे.

Web Title: konkan news chiplun handicap