पाचपट मोबदला हवा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

चिपळूण - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणासाठी शहरातील महामार्ग कृती समिती व बाधित नागरिकांची बैठक झाली. शहरातून संपादित होणाऱ्या जमिनीचा पाचपट मोबदला मिळावा, व्यवसाय नुकसान भरपाईपोटी शंभर टक्के दिलासा मिळावा, अशी मागणी या बैठकीत करण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादन दराबाबत येथील महामार्ग कृती समितीने महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. समितीच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे त्यांनी आश्‍वासन दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. कोणत्याही स्थितीत रेडीरेकनरच्या पाचपट मोबदला मिळवण्याचे ठरले. 

ज्या ठिकाणी गृहनिर्माण संस्थांची जागा संपादित होत आहे, अशा ठिकाणी संबंधित गृहनिर्माण संस्थेलाच भरपाई मिळायला हवी. त्यासाठी स्पॉट सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली. चौपदरीकरणात निर्माण होणाऱ्या प्रश्‍नाबाबत नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांची बुधवारी (ता.१२) सायंकाळी ४ वाजता भेट घेण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. त्यानतंर प्रांताधिकारी कल्पना जगताप यांचाही भेट घेण्यात येणार आहे. महामार्गालगत जाणारा रस्ता व त्यामधील शहरवासीयांच्या समस्यांबाबत निवेदन देण्याचे ठरले. मोकळी जागा आणि इमारतीस योग्य नुकसान भरपाई मिळावी यासाठी लवकरच मुख्यमंत्र्याचीही भेट घेण्यात येणार आहे. या बैठकीस उद्योजक राजू जोशी, अध्यक्ष राजेश वाजे, मुश्‍ताक बेबल. सुचयअण्णा रेडीज, रामशेठ रेडीज, नगरसेवक शशिकांत मोदी, बाबू तांबे, गजानन पाचांळ, हेमंत पालांडे, आसिफ पठाण, अप्पा खैर, सौ. उज्ज्वला जाधव यांच्यासह महामार्गात संपादित होणाऱ्या जमीनींचे मालक व गृहनिर्माण संस्था व व्यावसायिक संकुलांचे प्रतिनिधी, व्यवसायिक उपस्थित होते.

Web Title: konkan news chiplun news