कॉंग्रेसच्या कार्यक्रमांना अनुपस्थित सदस्यांवर कारवाई 

कॉंग्रेसच्या कार्यक्रमांना अनुपस्थित सदस्यांवर कारवाई 

सावंतवाडी - कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना पक्षाचे आदेश पाळावेच लागतील. पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहता अन्य पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सदस्यांवर कारवाई अटळ आहे. त्यात आमदार नितेश राणेही सुटणार नाहीत. राज्य कार्यकारिणीकडुन त्यांच्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, असा इशारा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला. 

ही कारवाई पक्षांतर्गंतबंदी नुसार करण्यात येणार आहे. कोणी आदेश डावलण्याचा प्रयत्न केल्याच जिल्हाधिकारी किंवा आयुक्त स्तरावरच याबाबतचे निर्णय ठरतील आणि तसे प्रकार जिल्ह्यात झाले आहेत. त्यामुळे कोणासोबत राहणे योग्य याचा विचार पदाधिकाऱ्यांनी करावा, असेही सावंत यांनी सांगितले. 

सावंत यांनी आज येथील राणी पार्वती देवी हायस्कुल मधील कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, जिल्हा प्रवक्ते डॉ. जयेंद्र परूळेकर, तालुकाध्यक्ष रविंद्र म्हापसेकर, शहरअध्यक्ष बाबल्या दुभाषी, चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. यावेळी तालुक्‍याची विस्तार कार्यकारणी जाहिर करण्यात आली. 

विकास सावंत म्हणाले,""जिल्हा परीषदेवर आजही कॉंग्रेसची सत्ता आहे. काही पंचायत समितीही कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत; मात्र आज काही लोकप्रतिनीधी कॉंग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून दुसऱ्या पक्षाच्या पक्षाच्या बॅनरखाली वावरत आहे हे चुकीचे असून कॉंग्रेसपक्ष ज्या ज्या वेळेला अशा लोकप्रतिनीधीना पक्षाच्या बैठकांना बोलावेल त्यावेळी त्यांनी बैठकांना उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. ज्या कोणाकडून हा आदेश मोडला जाईल त्याला पक्षाच्या तरतूदीनुसार कायद्याने नोटिसा बजाविण्यात येणार आहे. आमदार नितेश राणे यांच्याबाबतही हा नियम लागू असणार आहे; मात्र ते आमदार असल्याने त्याच्यावर राज्यस्तरावरून नोटीस बजाविण्यात येणार आहे.'' 

तालुक्‍यात उघडकीस आलेलील गांजा पार्टी प्रकरण हे युवा पिठीसाठी धोकादायक आहे. प्रशासनाने विशेषत: पोलिस प्रशासनाने याकडे गांभिर्याने पाहणे गरजेचे आहे. या प्रकरणात कॉंग्रेस पक्षाकडून वरीष्ठ पातळीवर निवेदन देण्यात येणार आहे. येत्या 26 जानेवारीला कुडाळ येथे चार वाजता सविधान बचाव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी मंडळीच उपस्थित राहणार आहे. तर ओरोस येथे जैतापकर कॉलनी येथे मध्ये कॉंग्रेसच्या मुख्य कार्यालयाचे उद्‌घाटन होणार आहे. शिवाय येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी पक्षाच्या प्रमुख नेत्याच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसाठी शिबीर आयोजित करण्यात येणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले. 

समविचारी पक्ष एकत्र येण्यासाठी प्रयत्न... 
कणकवली नगरपंचायत निवडणुकीत आमची स्वबळावर लढण्याची तयारी होती; मात्र त्याचा फायदा शिवसेना, भाजपाला होऊ नये म्हणून समविचारी पक्षांना सोबत घेऊन लढण्याबाबत आमचे प्रयत्न सुरू आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी जे कोणी उमेदवार इच्छुक आहेत त्यांनी आपले अर्ज संपुर्ण माहितीसह तालुका कॉंग्रेस कमिटीकडे सादर करावेत, असे आवाहन सावंत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com