गणपतीपुळे एमटीडीसी रिसॉर्ट सौरऊर्जेवर

राजेश कळंबटे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

रत्नागिरी -  महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) रिसॉर्टमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सौरऊर्जा यंत्रणा बसविण्याचे निर्देश पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी दिले आहेत. त्यासाठी माळशेज घाट, ताडोबा, नागपूर शहर यासह कोकणातील गणपतीपुळेची निवड करण्यात आली आहे. 

राज्यात एमटीडीसीच्या मालकीची साठहून अधिक रिसॉर्ट आहेत. त्यापैकी २२ रिसॉर्टचे व्यवस्थापन महामंडळ स्वत: करते. सौरऊर्जा यंत्रणा बसविल्यास मोठ्या प्रमाणावर विजेवरील खर्चात बचत होऊ शकते. याशिवाय हरितऊर्जेचा (ग्रीन एनर्जी) वापर केल्याने ही रिसॉर्ट पर्यावरणपूरक (इकोफेंडली) होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर माळशेज घाट, गणपतीपुळे, ताडोबा आणि नागपूर शहर येथील रिसॉर्टसाठी विजेच्या आवश्‍यकतेचे सर्वेक्षण करून सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात यावी. पुढे उर्वरित रिसॉर्टमध्ये सौरऊर्जा  प्रकल्प बसविण्याचा मानस आहे.

Web Title: konkan news Ganpatipule MTDC Resort Solar Energy